डय़ुरंड चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम लढतीत सुनील छेत्रीच्या नेतृत्वातील बंगळुरु एफसी संघाने मुंबई सिटी एफसीचा २- ने पराभव केला. कोलकातामधील सॉल्ट लेट स्टेडिअमवर हा अंतिम सामना पार पडला. दरम्यान, सामना संपल्यानंतर पार पडलेल्या बक्षीस वितरण समारंभातील दोन व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. हे व्हिडीओ पाहून फूटबॉलप्रेमी आणि क्रीडाप्रेमी संताप व्यक्त करत आहेत.

पहिल्या व्हिडीओत पश्चिम बंगालचे राज्यपाल गणेशन फोटोमध्ये येण्यासाठी सुनील छेत्रीला मागे ढकलत असल्याचं दिसत आहे.

दुसऱ्या व्हिडीओत अंतिम सामन्यात पहिला गोल करणारा शिवशक्ती नारायण यालादेखील एक पाहुणे मागे ढकलत असल्याचं दिसत आहे.

या कार्यक्रमात पुरस्कार देण्यासाठी आलेले पाहुणे फोटो काढण्यासाठी खेळाडूंपेक्षाही जास्त उत्साही दिसत होते. हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, ४० हजारांपेक्षा जास्त जणांनी पाहिला आहे. अनेक फूटबॉल चाहत्यांनी हे व्हिडीओ पाहून आश्चर्य व्यक्त केलं आहे.

भारतातील या दिग्गज फूटबॉलपटूंना दिली जाणारी वागणूक फार वाईट असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. देशातील खऱ्या आणि तरुण टँलेंटच्या मधे हे राजकारणी लोक नेहमी उभे असतात अशी कमेंट एका युजरने केली आहे. हे राजकारणी लोक आपल्याला काय समजतात अशी विचारणाही अनेकांनी केली आहे.

Story img Loader