PAK vs SL, World Cup 2023: मंगळवारी श्रीलंकेविरुद्धच्या आयसीसी विश्वचषक २०२३च्या दुसऱ्या सामन्यादरम्यान पाकिस्तान क्रिकेट संघाच्या क्षेत्ररक्षणाच्या बाजूने एक आश्चर्यकारक घटना घडली. या सामन्यात कुसल मेंडिसने एक हवाई शॉट खेळला, जो सीमारेषेवर उभ्या असलेल्या इमाम-उल-हकच्या हातात गेला. यादरम्यान, सीमारेषा ज्या ठिकाणी असायला हवी होती ती त्याच्याही मागे गेली असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
श्रीलंकन डावाच्या २९व्या षटकात शतकवीर कुसल मेंडिसने जास्तीत जास्त धावा करण्याच्या प्रयत्नात हसन अलीने टाकलेला संथ चेंडू हवेत भिरकावला, परंतु डीप मिडविकेटवर इमाम-उल-हकने त्याचा झेल घेतला आणि तो बाद झाला. आता या झेलवर चाहते प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यांच्या मते कुसल मेंडिस हा नाबाद आहे. कारण, आधी फिल्डिंग करताना खेळाडूने चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात बाउंड्री लाईन मागे गेली होती.
इमामच्या कॅचवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे
इमाम बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ होता पण त्याच्या आतच झेल पूर्ण केला. ७७ चेंडूत १४ चौकार आणि ६ षटकारांसह १२२ धावा करणाऱ्या मेंडिसला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. पण मेंडिसला माघारी पाठवण्यासाठी इमामने क्लीन कॅच घेतलेला नाही, त्यात काहीतरी गडबड असल्याचे नेटिझन्सच्या लगेच लक्षात आले. क्रिकेट चाहत्यांच्या लक्षात आले की सीमारेषा ज्या रेषेत असायला हवी होती त्या रेषेच्या मागे होती आणि इमाम सरळ रेषेवर होता पण दोरी मागे ढकलली गेल्यामुळे बाउंड्री लाईनला स्पर्श झाला नाही.
पाकिस्तानवर पुन्हा फसवणुकीचा आरोप
या झेलच्या सत्यतेवर सोशल मीडियावर लगेचच मीम्सचा पूर आला आहे, काहींनी पाकिस्तानी खेळाडूंवर पुन्हा एकदा सीमारेषा मूळ स्थितीपासून मागे ढकलल्याचा आरोपही केला आहे. यावर आता मॅच रेफरी काय निर्णय घेतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
श्रीलंकेने पाकिस्तानसमोर विजयासाठी ठेवले ३४५ धावांचे डोंगराएवढे आव्हान
पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका संघात विश्वचषक २०२३ स्पर्धेतील आठवा सामना खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर श्रीलंकेच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी केली. कुसल मेंडिस व सदिरा समरविक्रमा यांनी झळकावलेल्या शतकांच्या जोरावर श्रीलंकेने ९ बाद ३४४ धावा उभारल्या. पाकिस्तान संघासाठी वेगवान गोलंदाज हसन अली याने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या.
२१ षटकांत पाकिस्तानची धावसंख्या १२०/२
पाकिस्तान संघाने २१ षटकात २ बाद १२० धावा केल्या आहेत. इमाम उल हक आणि बाबर आझम बाद झाल्यानंतर अब्दुल्ला शफीक आणि मोहम्मद रिझवान यांनी डावाची धुरा सांभाळली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ८२ चेंडूत ८३ धावांची भागीदारी केली. शफिकने आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. ५९ धावा करून तो नाबाद आहे. मोहम्मद रिझवानने ३० धावा केल्या आहेत.