श्रीलंकेविरुद्धच्या टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेसाठी निवडलेल्या भारतीय संघात दोन नवीन नावे दिसली. त्यापैकी एक मुकेश कुमारचा, तर दुसरा शिवम मावीचा होता. या दोघांना आयपीएल लिलावात मोठी रक्कम मिळाली. हे दोन्ही खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याच्या प्रतिक्षेत आहेत. मुकेश कुमारला दिल्ली कॅपिटल्सने ५.५ कोटींना आणि शिवम मावीला गुजरात टायटन्सने ६ कोटींना विकत घेतले.
मुकेश कुमारची कथा वेगळी असेल, पण शिवम मावीची कथा जखमांनी भरलेली आहे. तो बराच काळ क्रिकेटपासून दूर आहे, पण राहुल द्रविडच्या एका सल्ल्याने त्याला खूप प्रेरणा मिळाली. आयपीएल २०२३ मिनी लिलावातील सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू असलेल्या मावीने बीसीसीआयने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी संघाची घोषणा करताना संघ निवडीच्या दिवसाविषयी सांगितले आहे.
मावीने क्रिकइन्फोला सांगितले की, “जेव्हा आम्ही देशांतर्गत क्रिकेट खेळतो, तेव्हा आम्ही विश्रांतीसाठी लवकर झोपी जातो, पण त्या दिवशी, मी ऐकले की संघाची घोषणा होणार आहे, मी सौरभ (डावा हाताचा फिरकी गोलंदाज सौरभ कुमार) सोबत झोपायला गेलो. समर्थ (सिंग) सोबत भैय्याच्या खोलीत बसलो. माझ्या निवडीबद्दल मला कळताच क्षणभर सर्व काही थांबले. एक आश्चर्यकारक अनुभूती होती. मी भावूक झालो होतो, पण माझी वेळ आली आहे हे मला माहीत होते.”
युवा गोलंदाज शिवम मावी त्याच्या दुखापतीबद्दल बोलताना तो म्हणाला, “मी नेहमीच मानसिकदृष्ट्या खूप खंबीर राहिलो आहे. यादरम्यान मी जे शिकलो ते म्हणजे दुखापती हा खेळाचा एक भाग आहे. जेव्हा गोष्टी तुमच्या मार्गावर असतात तेव्हा सकारात्मक राहणे सोपे असते, पण जेव्हा तुम्ही दुखापत झाल्यास सकारात्मक राहणे अधिक महत्त्वाचे आहे. मी स्वतःला याची आठवण करून देतो.”
मावीने भारताचा प्रशिक्षक राहुल द्रविडसोबतच्या संभाषणाबद्दल पुढे सांगितले, “जेव्हा मी दुसऱ्यांदा जखमी झालो तेव्हा मी एनसीएमध्ये होतो आणि राहुल (द्रविड) सरही तिथे होते. वारंवार झालेल्या दुखापतींमुळे माझ्यावर दबाव होता. तेव्हाच मी त्याला शोधले. आणि त्याचा सल्ला घेतला. त्याने मला माझे लक्ष खेळाच्या मैदानावर केंद्रित करण्यास सांगितले. त्याने मला सांगितले की दुखापती येतात आणि जातात, पण वाटेत येणाऱ्या सर्व संधींसाठी तू तयार असायला हवे. ते महत्त्वाचे आहे.”
राहुल द्रविडने दिला मोलाचा सल्ला
राहुल द्रविडकडून मिळणारे मार्गदर्शन कोणत्याही युवा क्रिकेटपटूसाठी अमूल्य आहे. प्रतिभावान वेगवान गोलंदाज शिवम मावी देखील याला अपवाद नाही, जो भारताच्या माजी कर्णधाराच्या विशेष सल्ल्याचे पालन करण्याचा प्रयत्न करीत आहे. ‘द वॉल’ द्रविडने मावीला ‘खेळावर लक्ष केंद्रित करा, पैसा आपोआप येईल’ असा सल्ला दिला आहे. विश्वचषक विजेत्या भारताच्या अंडर-१९ संघाचा सदस्य असलेला मावी आगामी आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सनेकडून (GT) खेळेल, त्याला ६ कोटी रुपयांना विकत घेण्यात आले आहे.