भारतीय क्रिकेट संघ सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा या दौऱ्यावर जातानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. भारतीय संघाला बांगलादेशमध्ये एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळायची आहे. पहिला सामना ४ डिसेंबरपासून म्हणजेच रविवारी खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या वरिष्ठ खेळाडूंनी सराव सत्रात घाम गाळला. बांगलादेशला रवाना होतानाचा रोहित शर्माचा फोटोग्राफरसोबत संवाद साधतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या आयसीसी टी-२० विश्वचषकानंतर, कर्णधार रोहित शर्माला न्यूझीलंड दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली होती. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत तो अनेक वरिष्ठ खेळाडूंसह पुनरागमन करत आहे. विश्रांतीनंतर या मालिकेत प्रशिक्षक राहुल द्रविडही संघासोबत दिसला. विमानतळावर भारतीय कर्णधारासोबत असे काही घडले, जे पाहिल्यानंतर तुमच्याही चेहऱ्यावर हसू येईल.
रोहितचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो मुंबईहून बांगलादेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी फोटोग्राफरशी बोलताना दिसत आहे. ज्यामध्ये रोहितने विचारले, ‘असे फोटो काढून तुम्ही काय करता.’ त्यावर फोटोग्राफर उत्तर देताना म्हणाला, ‘आमचे कर्तव्य आहे. आम्ही सर्व मीडियाचे आहोत.’ त्यानंतर रोहित म्हणाला चांगले कर्तव्य काय आहे.
वनडे मालिकेसाठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.