World Cup 2023 and Inzamam Ul Haq Resigns: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये पाकिस्तानच्या निराशाजनक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठे वादळ निर्माण झाले आहे. घराणेशाहीच्या आरोपांमुळे पीसीबीमध्ये तडकाफडकी बदल करण्यात येत आहे. सोमवारी, माजी कर्णधार इंझमाम-उल-हकने विश्वचषक स्पर्धेच्या मध्यभागी मुख्य निवडकर्ता म्हणून आपल्या पदाचा राजीनामा दिला. या विश्वचषकात पाकिस्तानचा सलग चौथा पराभव झाल्यानंतर इंझमामने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख झका अश्रफ यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे.

मुख्य निवडकर्ता म्हणून इंझमामचा करार संपल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अडचणी वाढू शकतात. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंझमामला सहा महिन्यांपासून पगार मिळालेला नाही आणि त्याच्या राजीनाम्यानंतर बोर्डाला त्याला १.५ कोटी पाकिस्तानी रुपये द्यावे लागतील. इंझमामचा मासिक पगार २५ लाख पाकिस्तानी रुपये होता.

Jitendra awhad daughter Natasha Awhad
Natasha Awhad: “भाजपाला ही निवडणूक जिंकायचीच होती, कारण…”, जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचा खळबळजनक दावा
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra Cabinet Expansion : महायुतीत गृहमंत्रिपदाचा तिढा सुटेना? आता शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आम्ही अद्याप…”
Sonu Nigam
सोनू निगम कार्यक्रम सोडून गेलेल्या नेत्यांवर नाराज; म्हणाला, “हा सरस्वतीचा अपमान…”
S M krushna
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा यांचे निधन, वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
why Shatrughan Sinha married Poonam despite his affair with Reena Roy
रीना रॉयबरोबर अफेअर असूनही पूनमशी लग्न का केलं? शत्रुघ्न सिन्हा म्हणालेले, “निर्णय घेणं…”

हेही वाचा: PCB on Babar Azam: “हे खोटं असून…”, पीसीबीने बाबरच्या लीक व्हॉट्सअ‍ॅप चॅटवर केले मोठे विधान; वकार युनूसने दिली प्रतिक्रिया

घराणेशाहीच्या हितसंबंधांत इंझमामचा सहभाग असण्याच्या शक्यतेमुळे त्याने राजीनामा दिली अशीही चर्चा सुरु आहे. त्यामुळे हा विजय आणखी गुंतागुंतीचा झाला आहे, असे दिसून आले की, इंझमाम हा “याझो इंटरनॅशनल लिमिटेड” मध्ये भागधारक आहे, ही कंपनी क्रिकेटर्स एजंट तलहा रहमानी यांच्या मालकीची आहे. महत्त्वाचे म्हणजे, रहमानी पाकिस्तानच्या काही प्रमुख क्रिकेटपटूंचे प्रतिनिधित्व करतात, ज्यात बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि शाहीन शाह आफ्रिदी यांचा समावेश आहे. रिझवान हा या फर्मचा सहमालकही आहे.

केंद्रीय कराराबाबत पीसीबी आणि खेळाडूंमध्ये मतभेद असल्याच्या बातम्या आल्यानंतर अनेक खुलासे झाले, त्यानंतर गदारोळ सुरू झाला. २०२३च्या विश्वचषकापूर्वी तणाव तीव्रतेच्या शिखरावर पोहोचला. खेळाडूंनी हाय-प्रोफाइल स्पर्धेदरम्यान व्यावसायिक मालिकांवर बहिष्कार टाकण्याची शक्यता लक्षात घेऊन पीसीबीला एक निर्णय घ्यावा लागला. आयसीसीकडून मिळणाऱ्या पैशाचा काही भागही खेळाडूंना देण्यात यावा, अशी त्यांची मागणी होती.

प्रमुख पाकिस्तानी क्रिकेटपटूंबरोबर आपला एजंट शेअर करणारा इंझमाम मध्यस्थी करण्यासाठी पुढे आला आणि ४८ तासांत वाद सोडवण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या मध्यस्थीने हा गोंधळ मिटला आणि सर्व खेळाडूंच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. यामुळे, इंझमामचा करार वादात सहभाग आणि त्याच्या हितसंबंधांच्या संभाव्य संघर्षामुळे मुख्य निवडकर्ता म्हणून त्याच्या भूमिकेवर परिणाम झाला. दुसरीकडे, पाकिस्तान संघ जवळपास विश्वचषकातून बाहेर पडला आहे.

हेही वाचा: Hardik Pandya Injury: टीम इंडियासाठी मोठी बातमी! हार्दिक पांड्याने नेटमध्ये सरावाला केली सुरुवात, कधी करणार संघात पुनरागमन?

इंझमामने दिले यावर स्पष्टीकरण

पीसीबी प्रमुखांनी कर्णधार बाबर आझमचे बोर्डाच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याशी केलेले कथित खासगी संभाषण लीक केल्यानंतर झका अश्रफ यांच्यावर टीका होत आहे. दुसरीकडे, भारतातील विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या मार्गावर असलेल्या पाकिस्तान संघाला आधीच टीकेला सामोरे जावे लागले आहे. इंझमामने त्याच्या निवेदनात म्हटले की, “ऑगस्टमध्ये मी या पदावर नियुक्त झालो होतो. लोक तपास न करता विधाने करत आहेत. मी पीसीबीला यामागील सत्य शोधण्यास सांगितले आहे. माझा प्लेयर-एजंट कंपनीशी कोणताही संबंध नाही, तरीही पाकिस्तान पुरुष क्रिकेट निवड समितीचा अध्यक्ष म्हणून राजीनामा देत आहे.”

Story img Loader