इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे (ईसीबी) अध्यक्ष इयान व्हॉटमोर यांनी पाकिस्तान क्रिकेट मंडळाची (पीसीबी) माफी मागितली आहे. इंग्लंड बोर्डाने पुरुष आणि महिला संघाचा पाकिस्तान दौरा रद्द केला होता. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांसह अनेकांनी इंग्लंडवर टीका केली होती. मात्र इंग्लंडने आता पाकिस्तानची माफी मागत एक आश्वासन दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुढील वर्षी इंग्लंड संघ पाकिस्तानविरुद्ध तीन कसोटी आणि पाच एकदिवसीय सामने खेळेल, असे ईसीबीने पीसीबीला आश्वासन दिले आहे. व्हॉटमोर म्हणाले, “ज्यांना आमच्या निर्णयामुळे त्रास किंवा दु:ख झाले, त्यांच्यासाठी मला विशेषतः खेद आहे. विशेषतः पाकिस्तानसाठी. बोर्डाने घेतलेला निर्णय कठीण होता. खेळाडू आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि मानसिक आरोग्य लक्षात घेऊन हा निर्णय घेतला गेला.”

हेही वाचा – KKR vs DC : रवीचंद्रन अश्विनसोबत बाचाबाची झाल्यानंतर मॉर्गन म्हणतो, “आम्ही सर्वजण…”

व्हॉटमोर यांनी मंगळवारी डेली मेलला असेही सांगितले, की बोर्डाने आपला निर्णय घेण्यापूर्वी इंग्लंडच्या खेळाडूंचा सल्ला घेतला नव्हता. “बोर्डाने स्वतःच्या निर्णयावर आधारित निर्णय घेतला. जर आम्ही या दौऱ्यावर पुढे जाण्याचा निर्णय घेतला असता, तर आम्हाला खेळाडूंना प्रसताव द्यावा लागला असता. पण ही गोष्ट तिथपर्यंत पोहोचली नाही”, असे व्हॉटमोर म्हणाले.

ते म्हणाले, “आम्ही पुढील वर्षी पाकिस्तानचा योग्य दौरा, नियोजित दौरा करण्याची शिफारस केली आहे आणि आम्ही योजनेसह पुढे जाऊ. त्या दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी आम्हाला अधिक वेळ लागेल.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ecb apologises to pakistan promises full tour next year adn