Brayden Curse to replace Reece Topley: एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या स्पर्धेत इंग्लंड संघासाठी काहीही चांगले चालले नाही. अफगाणिस्तानकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १७० धावांत ऑलआऊट झाल्यानंतर इंग्लंड संघाला रविवारी आणखी एक धक्का बसला. वास्तविक, संघाचा वेगवान गोलंदाज रीस टॉप्ली बोटाच्या दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर पडला आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) आता त्याच्या जागी बदली खेळाडूची घोषणा केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रीस टॉप्लीच्या जागी बदली खेळाडू ब्रायडनकर्सला मिळाली संधी –

ईसीबीने रीस टोप्लीच्या जागी ब्रायडन कर्सचे नाव जाहीर केले आहे. दक्षिण आफ्रिकेत जन्मलेल्या ब्रायडन कर्सने इंग्लंडकडून मर्यादीत षटकांतील क्रिकेट खेळले आहे. त्याने इंग्लंडकडून १२ एकदिवसीय आणि ३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर १२ एकदिवसीय सामन्यांच्या ११ डावांमध्ये ३३.९२ च्या सरासरीने १४ विकेट्स घेतल्या आहेत, तर ३ टी-२० सामन्यांमध्ये त्याच्या नावावर ४ विकेट्स आहेत. टोपलीच्या बदली खेळाडू म्हणून ब्रायड कर्सेचे नाव आघाडीवर होते. जरी जोफ्रा आर्चर देखील या शर्यतीत होता, परंतु आर्चर सध्या रिहॅब प्रक्रियेतून जात आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात टॉप्लीला झाली होती दुखापत –

रीस टॉप्लीला विश्वचषक स्पर्धेतून वगळणे हा इंग्लंडसाठी मोठा धक्का आहे. या विश्वचषकात टॉप्ली आतापर्यंत उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत होता. त्याने ३ सामन्यात ८ विकेट्स घेतल्या होत्या. टॉप्ली हा या विश्वचषकात इंग्लंडकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. शनिवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यादरम्यान रीस टॉप्लीला दुखापत झाली होती. मात्र, त्यानंतरही त्याने टेप लावून गोलंदाजी केली होती.

हेही वाचा – Asian Para Games 2023: पुरुषांच्या उंच उडी टी-४७ फायनलमध्ये भारताच्या निषाद कुमारने जिंकले सुवर्णपदक

एकदिवसीय विश्वचषकासाठी इंग्लंडचा संघ –

जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशीद, जो रूट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, ब्रायडन कर्स, डेव्हिड विली, मार्क वुड, ख्रिस वोक्स.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ecb names braydon curse as replacement for reece topley for world cup 2023 vbm
Show comments