Oli Robinson clean bold Usman Khawaja: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅशेस मालिकेतील पहिल्या सामन्याचा आज तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात ३८६ धावांवर गडगडला. बराच वेळ क्रीजवर थांबलेल्या उस्मान ख्वाजाला ओली रॉबिन्सनने क्लीन बोल्ड केले. ख्वाजा बाद होताच कांगारूंचा संघ पत्त्यासारखा विखुरला होता. ओली रॉबिन्सनने उस्मान ख्वाजाला क्लीन बोल्ड केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

उस्मान ख्वाजा कसा बाद झाला?

उस्मान ख्वाजाला बाद करणारा चेंडू यॉर्कर लेंथचा होता. ज्याने स्टंप उखडल्या. ख्वाजाने ३२१ चेंडूत १४१ धावा केल्या. त्याच्या बॅटमधून १४ चौकार आणि ३ षटकार आले. उस्मान ख्वाजा सातव्या विकेटच्या रुपाने बाद झाला. यानंतर ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ १४ धावांत गारद झाला. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाने अॅशेस मालिकेत शतक झळकावून संघाला बळकटी तर दिलीच पण १३९ वर्षे जुना विक्रमही केला. ख्वाजा १८८४नंतर दुसऱ्या देशात जन्मलेला आणि अॅशेसमध्ये शतक झळकावणारा पहिला ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला.

AUS vs PAK Match Updates Australia vs Pakistan 1st ODI
AUS vs PAK : पाकिस्तानची झुंज अपयशी, अखेरीस ऑस्ट्रेलियाने पहिल्या वनडेत मिळवला रोमहर्षक विजय
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Ball tampering by India A players during the match against Australia A test match sports
भारत ‘अ’ संघावर चेंडूशी छेडछाड केल्याचे आरोप!
IND vs NZ Tom Latham Statement After India clean sweep
IND vs NZ : ‘आम्ही भारतीय संघाच्या खेळण्याच्या पद्धतीबद्दल…’, ऐतिहासिक मालिका विजयानंतर टॉम लॅथमने सांगितले किवीच्या यशाचे गुपित
IND vs NZ India suffered their first-ever home series whitewash in a three-match Test series, losing the third Test at the Wankhede Stadium in Mumbai by 25 runs on Sunday
IND vs NZ : टीम इंडियाचा सलग तिसऱ्या सामन्यात लाजिरवाणा पराभव! न्यूझीलंडने व्हाइट वॉश करत भारतात घडवला इतिहास
Rishabh Pant attained a stellar milestone and surpassed his idol, MS Dhoni
Rishabh Pant : ऋषभ पंतने अवघ्या ३६ चेंडूत अर्धशतक झळकावत केला खास पराक्रम, महेंद्रसिंग धोनीलाही टाकले मागे
Virat Kohli run out after Matt Henry direct hit video viral IND vs NZ 3rd Test
Virat Kohli : विराट कोहलीचा आत्मघातकी रनआऊट, रनमशीनचा वेग कमी पडला अन्… पाहा VIDEO
IND vs NZ India Lost 3 Wickets in Just 9 Balls Yashasvi Jaiswal Bowled Virat Kohli Suicidal Run Out on Day 1 of Mumbai test
IND vs NZ: ९ चेंडूत ३ विकेट्स आणि टीम इंडियाची हाराकिरी, रोहित-विराटने पुन्हा केलं निराश

ब्रॉड-रॉबिन्सनने ६ विकेट घेतल्या –

इंग्लंडकडून पहिल्या डावात स्टुअर्ट ब्रॉडने शानदार गोलंदाजी करताना २३ षटकांत ६८ धावा देताना ३ बळी घेतले. त्याचबरोबर ओली रॉबिन्सनने २२.१ षटकांत ५५ धावा देताना ३ बळी घेतले. तसेच मोईन अलीने २ बळी घेतले. जेम्स अँडरसन आणि बेन स्टोक्सला १-१ विकेट मिळाली.

हेही वाचा – ENG vs AUS: “मी पहिल्यांदाच अशी टीम पाहिली जी…”, फुटबॉल टीमचे कोच गॅरेथ साउथगेटकडून बेन स्टोक्सचे कौतुक

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव –

इंग्लंडने पहिल्या डावात ८ गडी गमावून ३९३ धावा केल्या होत्या. जो रूटने ११८ तर जॉनी बेअरस्टोने ७८ धावांची शानदार खेळी केली. यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात ३८६ धावांवर गारद झाला. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने १४१ धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. ट्रॅव्हिस हेड आणि अॅलेक्स कॅरी यांनीही अर्धशतके झळकावली. तिसऱ्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत ऑस्ट्रेलिया या सामन्यात ७ धावांची आघाडी घेऊन पुढे आहे.