मुंबई : आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) १४१व्या अधिवेशनात आठ नव्या सदस्यांची निवड करण्यात आली असून, आता ‘आयओसी’चे कार्यकारी मंडळ १०७ जणांचे असेल.नव्याने समावेश करण्यात आलेल्या आठ सदस्यांमध्ये चार महिलांचा समावेश असून, यामुळे आता ‘आयओसी’मध्ये महिलांची टक्केवारी ४१.१ टक्के राहिली आहे.
‘आयओसी’चे कामकाज करताना जास्तीत जास्त महिलांना सामावून घेण्याचे ‘आयओसी’चे धोरण असून, त्या दृष्टीने आम्ही एक पाऊल पुढे टाकले आहे, असे ‘आयओसी’ने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. या निवडणुकीत इस्रायलच्या याएल अराद, हंगेरीच्या बलाझ फ्युरेस, पेरुच्या सेसिलिया रोक्साना टेट व्हिलाकोर्टा यांना स्वतंत्र सदस्य म्हणून सामावून घेण्यात आले आहे.