वृत्तसंस्था, बुसान

भारतीय संघाने कबड्डीतील मक्तेदारी पुन्हा एकदा सिद्ध करताना आशियाई अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद पटकावले. कोरियातील बुसान येथे झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शुक्रवारी भारतीय पुरुष संघाने कडवी झुंज देणाऱ्या इराणला ४२-३२ अशा फरकाने पराभूत केले. भारताने नऊ पर्वात आठव्यांदा ही स्पर्धा जिंकली.भारतीय संघाने या स्पर्धेत वर्चस्वपूर्ण कामगिरी करताना आपले पाचही साखळी सामने जिंकत अंतिम फेरी गाठली आणि अंतिम फेरीत इराणचे आव्हान परतवून लावले.

PAK vs SA Corbin Bosch takes wicket on first ball of Test career to create new record
PAK vs SA: पदार्पणाच्या कसोटीत आफ्रिकेच्या खेळाडूने पहिल्याच चेंडूवर केला मोठा विक्रम, १३५ वर्षांत पहिल्यांदाच घडलं असं काही
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Dabur Vs Patanjali
Dabur Vs Patanjali : च्यवनप्राशच्या जाहिरातीवरून डाबर आणि पतंजली भिडले! बाबा रामदेव यांच्या कंपनीला दिल्ली उच्च न्यायालयाचे समन्स
Vijay Hazare Trophy Mumbai Beat Arunachal Pradesh by 9 Wickets Under Shardul Thakur Captaincy
Vijay Hazare Trophy: शार्दूल ठाकूरच्या नेतृत्वात मुंबईने उडवला अरुणाचलचा धुव्वा; अवघ्या ३३ चेंडूत जिंकला सामना
IND vs AUS boxing day test 2024
IND vs AUS : रोहित शर्माने घेतला मोठा निर्णय! ‘या’ स्टार खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमधून दाखवला बाहेरचा रस्ता
Shreyas Iyer 40 Runs Inning Made Mumbai Win in Low Scoring Match vs Hyderabad Vijay Hazare Trophy
Shreys Iyer: श्रेयस अय्यरची कमाल, ९व्या क्रमांकावर फलंदाजीला आला अन् २० चेंडूत पालटला सामना; मुंबईचा दणदणीत विजय
Maharashtra Loksatta Lokankika Kolhapur division Why Not Ekankika won Mumbai news
कोल्हापूर विभागाची ‘व्हाय नॉट?’ महाराष्ट्राची लोकांकिका; रत्नागिरी विभागाच्या ‘मशाल’ला द्वितीय तर पुण्याच्या ‘सखा’ला तृतीय पारितोषिक
Dommaraju Gukesh Ding Liren World Chess Championship Match Entertainment news
दक्षिणी दिग्विजयाचा अर्थ…

अंतिम लढतीत भारताने दमदार सुरुवात केली. दहाव्या मिनिटाला भारताने इराणवर लोण दिला. कर्णधार पवन सेहरावतने खोलवर चढाई करताना इराणच्या दोन खेळाडूंना बाद करत भारताला १०-४ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर आणखी एक लोण चढवताना भारताने मध्यंतरापर्यंत आघाडी २३-११ अशी वाढवली.

उत्तरार्धात अपेक्षेप्रमाणे इराणने खेळ उंचावला. मात्र, भारतानेही वेगवान खेळ सुरू ठेवताना पुन्हा इराणवर लोण देत ३३-१४ अशी आघाडी भक्कम केली. यानंतर मात्र इराणने पुनरागमन केले. दोन मिनिटे शिल्लक असताना इराणने भारताची आघाडी ३८-३१ अशी कमी केली. त्या वेळी केवळ अस्लम इनामदार मॅटवर शिल्लक होता. परंतु इराणचा कर्णधार मोहम्मदरेझा शाबलोउई चियानेला अस्लमला बाद करण्यात अपयश आल्याने भारताला ‘सुपर टॅकल’चे तीन गुण मिळाले. त्यामुळे भारताचा विजय सुनिश्चित झाला.

सहा संघांचा सहभाग

आशियाई अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत भारतासह इराण, जपान, कोरिया, चायनीज तैपेई आणि हाँगकाँग या संघांचा सहभाग होता. भारताने या स्पर्धेतील सर्वात मोठा विजय कोरियाविरुद्ध ७६-१३ असा मिळवला. तर साखळी सामना आणि अंतिम सामन्यात इराणने भारताला कडवी झुंज दिली.

आशियाई क्रीडा स्पर्धेकडे लक्ष

भारतीय कबड्डी संघ आता सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये चीनमधील हांगझो येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभाग नोंदवेल. २०१८ साली जकार्ता येथे झालेल्या स्पर्धेच्या गेल्या पर्वात भारताला उपांत्य फेरीत इराणकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे यंदा त्या पराभवाची परतफेड करतानाच सुवर्णपदक जिंकण्याचे भारताचे लक्ष्य असेल.

Story img Loader