Elavenil Valarivan won second gold medal in women’s 10m air rifle event: ऑलिम्पियन इलावेनिल वालारिवनने आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पोर्ट फेडरेशन (आयएसएसएफ) विश्वचषक रायफल/पिस्तूल स्पर्धेत शानदार कामगिरी केली. तिने महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात तिचे दुसरे सुवर्णपदक जिंकले. इलावेनिलने चमकदार कामगिरी केली, आठ महिलांमध्ये २४-शॉट फायनलमध्ये कधीही १०.१ पेक्षा कमी गुण मिळवले नाहीत.

इलावेनिल पात्रतेमध्ये आठव्या स्थानावर होती –

इलावेनिलने २५२.२ गुण मिळवत फ्रान्सच्या २० वर्षीय ऑसियन मुलरचा २५१.९ गुणांसह पराभव करत दुसरा क्रमांक पटकावला. चीनच्या झेंग जियालने तिसरे स्थान मिळवून कांस्यपदक जिंकले. इलावेनिलने ६३०.५ गुणांसह आठव्या स्थानावर राहून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. ऑसियन मुलरने पात्रता फेरीत ६३३.७ गुणांसह अव्वल स्थान पटकावले होते. चीनच्या झेंग जियाली आणि झेंग यू या दोन नेमबाजांशिवाय नॉर्वेची युरोपियन चॅम्पियन जेनेट हेग ड्यूस्टेडनेही अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

Sanskruti More, a visually challenged chess player, satara district
अंधत्वावर मात करून यशशिखर गाठणारी बुद्धीबळपटू संस्कृती मोरे
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Ranji Trophy Goa Batters Highest Ever Partnership in 90 Year Old History
Ranji Trophy: ६०६ धावांची विक्रमी भागीदारी अन् गोव्याच्या २ फलंदाजांची त्रिशतकं, रणजी ट्रॉफीच्या ९० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं काही
Border Gavaskar Trophy IND vs AUS Memorable Innings in Marathi
Border Gavaskar Trophy Best Innings: सचिन, द्रविड, पंत अन् बुमराहचा स्लोअर बॉल…, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या इतिहासातील संस्मरणीय क्षण
Champions Trophy Javed Miandad Angry on India for Not Travelling Pakistan Said If We Dont Play India at all Pakistan cricket will Prosper
Champions Trophy: “भारत-पाकिस्तान सामनाच नाही झाला तर…”, टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी येणार नसल्याने BCCI, ICCवर संतापले जावेद मियांदाद
Border Gavaskar Trophy History Stats Records Head to Head All You need To Know About India vs Australia Test Series
Border Gavaskar Trophy: भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेला ‘बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी’ हे नाव का देण्यात आलं? सर्वाधिक मालिका कोणी जिंकल्यात? वाचा इतिहास
Maharashtra coach Sulakshan Kulkarni regretted the loss of victory sports news
निराशाजनक पराभवामुळे आव्हान खडतर! विजय निसटल्याची महाराष्ट्राचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांना खंत

संदीप सिंग राहिला १४व्या स्थानावर –

पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात भारताचा संदीप सिंग ६२८.२ गुणांसह पात्रतेमध्ये १४ व्या स्थानावर राहिला. शुक्रवारी, इलावेनिलने संदीपसह १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेत ६२९.९१ चा एकत्रित गुण नोंदवले. या स्पर्धेच्या पदक फेरीत चौथे आणि शेवटचे स्थान इस्रायलला मिळाले, ज्याने ४२ संघांच्या स्पर्धेत भारतापेक्षा ०.५ गुण अधिक मिळवले. इलावेनिलने ३१४.८ तर संदीपने ३१४.३ गुण केल्या. भारतीय जोडी थोड्या फरकाने कांस्यपदकासाठीची स्पर्धा गमावली.

हेही वाचा – Asia Cup 2023 Final: विराटसोबत सेल्फी काढण्यासाठी जमली गर्दी, शुबमन, इशान आणि सूर्याला चाहत्यांनी नाही दिला भाव, पाहा VIDEO

शेवटी इस्रायलने कांस्यपदक जिंकले. जर्मनीने सुवर्णपदक तर हंगेरीने रौप्यपदक पटकावले. भारताचा १६ सदस्यीय संघ रिओ विश्वचषकात सात ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भाग घेत आहे. इटली दोन सुवर्णांसह आघाडीवर आहे, तर भारत आणि आर्मेनिया संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहे.

सौरभचा खराब फॉर्म कायम –

सौरभ चौधरी, गेल्या दीड वर्षातील आपली पहिली मोठी स्पर्धा खेळत आहेय. तो रिओ दि जानेरो येथे खेळल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ (आयएसएसफ) रायफल/पिस्तूल विश्वचषकात पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूलमध्ये ३०व्या स्थानावर राहिला. अनेक विश्वचषक विजेत्या सौरभने फेब्रुवारी-मार्च २०२२ मध्ये कैरो येथे आयएसएसफ स्पर्धेत शेवटचा सामना खेळला होता. गुरुवारी रिओमध्ये झालेल्या ६० शॉटच्या पात्रता स्पर्धेत ५७२ गुणांसह तो ३०व्या स्थानावर राहिला.