WPL 2025 RCB vs MI Updates in Marathi: वुमन्स प्रीमियर लीगमध्ये आरसीबी वि मुंबई इंडियन्स यांच्यात एक अटीतटीचा सामना खेळवला जात आहे. आरसीबी स्टार फलंदाज एलिस पेरीने वुमन्स प्रीमियर लीगमधील वैयक्तिक सर्वात मोठी खेळी साकारत संघाचा डाव सावरला. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १६७ धावांचा डोंगर उभारल आहे. १०० धावांच्या आत ४ विकेट्स आरसीबीने गमावले होते पण पेरीने उत्कृष्ट फटकेबाजी करत आरसीबीला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले.

मुंबई संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याची निर्णय घेतला. स्मृतीची वादळी फलंदाजी पाहून हा निर्णय चुकीचा ठरतो की काय असे वाटत होते पण संघाला एकामागून एक विकेट मिळाल्या. एका टोकावरून विकेट पडत असताना एकटी एलिस पेरी पूर्ण वेळ मैदानावर होती.

एलिस पेरीने ४३ चेंडूत ११ चौकार आणि २ षटकारांसह ८१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. एलिस पेरीची ही WPL मधील वैयक्तिक मोठी धावसंख्या आहे. स्मृती मानधनाने वादळी सुरूवात करत संघाच्या धावसंख्येचा पाया रचला. स्मृतीने १३ चेंडूत १ षटकार आणि ४ चौकारांसह २६ धावा केल्या. याशिवाय रिचा घोषने २५ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकारासह २८ धावा करत एलिस पेरीला चांगली साथ दिली. याशिवाय आरसीबीचे सर्व फलंदाज एकेरी धावसंख्येवर बाद झाले.

एलिस पेरीने नेहमीच मुंबई इंडियन्सविरूद्ध वादळी खेळी केली आहे. पेरीने कायमच मोठ्या खेळी करत मुंबईला सामन्यात धक्का दिले आहेत. गतवर्षीच्या WPL २०२४ च्या एलिमिनेटर सामन्यात एलिस पेरीने वादळी खेळी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली होती. पेरीने एकटीने ५५० चेंडूत ६६ धावांची शानदार खेळी केली.

आरसीबीने मुंबईला विजयासाठी १६९ धावांचं आव्हान दिलं आहे. या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने ९ धावांवर पहिली विकेट मिळवली आहे.

Story img Loader