आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे(बीसीसीआय) अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांच्यावर राजीनाम्याचा दबाव दिवसेंदिवस वाढत चालल्याने, उद्या रविवारी श्रीनिवासन चेन्नई येथे बीसीसीआयची तातडीची बैठक घेणार आहेत. या बैठकीत एन. श्रीनिवासन राजीनामा देण्याची शक्यता आहे.  बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांमधील संजय जगदाळे आणि अजय शिर्के यांनी शुक्रवारी राजीनामा दिला आहे. या पार्श्वभूमीवर श्रीनिवासन राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बीसीसीआयची ही बैठक उद्य़ा सकाळी ११ वाजता चेन्नई येथे होणार आहे. मंडळाचे उपाध्यक्ष अरूण जेटली आणि सचिव अनुराग ठाकुर यांनी काही तासांतच काहीतरी नवीन ऐकायला मिळेल, असे सूचक वक्तव्य केल्यानंतर, “उद्या रविवार सकाळी ११ वाजता चेन्नई येथे बीसीसीआयच्या पदाधिकाऱयांची बैठक होणार आहे.” असे बीसीसीआयचे क्रिडा विकास व्यवस्थापक, रत्नाकर शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.  

Story img Loader