Emerging Asia Cup 2023 IND A vs PAK A Final: रविवारी (२३ जुलै) श्रीलंकेत सुरू असलेल्या पुरूषांच्या उदयोन्मुख आशिया चषक २०२३ स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत अ संघ पाकिस्तान अ संघाशी भिडणार आहे. दोघांमधील हा सामना कोलंबोतील प्रसिद्ध आर प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये बांगलादेशचा पराभव केला. त्याचवेळी पाकिस्तानने यजमान श्रीलंकेचा पराभव करत अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले होते. या स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा दुसरा सामना असणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारत या स्पर्धेत अजिंक्य ठरला आहे –

उदयोन्मुख आशिया चषक २०२३ स्पर्धेत भारताचा प्रवास नेत्रदीपक राहिला आहे. त्यानी एकही सामना गमावलेला नाही. भारताने पहिल्याच सामन्यात संयुक्त अरब अमिरातीचा (यूएई) आठ विकेट राखून पराभव केला. यानंतर दुसऱ्या सामन्यात नेपाळचा नऊ गडी राखून पराभव केला. गटातील त्यांच्या शेवटच्या सामन्यात भारत-अ संघाने पाकिस्तानचा आठ गडी राखून पराभव करण्यात यश मिळवले. त्यानंतर उपांत्य फेरीत बांगलादेशचा ५१ धावांनी पराभव केला. अशा प्रकारे टीम इंडियाने धावांचा पाठलाग करताना चारपैकी तीन सामने जिंकले आणि एकात प्रथम फलंदाजी केली.

पाकिस्तानला एका सामन्यात पराभव पत्करावा लागला –

या स्पर्धेत पाकिस्तानने चारपैकी तीन सामने जिंकले आहेत. एकात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने नेपाळचा चार गडी राखून पराभव केला होता. यानंतर दुसऱ्या सामन्यात त्यांनी यूएईचा १८४ धावांनी पराभव केला. तिसऱ्या सामन्यात भारताविरुद्ध आठ गडी राखून पराभव झाला होता. त्याचवेळी, उपांत्य फेरीत पाकिस्तानी संघाने यजमान श्रीलंकेचा ६० धावांनी पराभव केला.

हेही वाचा – MLC 2023: आंद्रे रसेलच्या गगनचुंबी षटकाराने जखमी झाला लहान मुलगा, सामन्यानंतर कॅरेबियन खेळाडूने केली विचारपूस

भारत अ संघ –

साई सुदर्शन, अभिषेक शर्मा, निकिन जोस, यश धुल्ल (कर्णधार), निशांत सिंधू, रियान पराग, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), हर्षित राणा, मानव सुथार, आरएस हंगरगेकर, युवराज सिंग डोडिया, प्रभसिमरन सिंग, आकाश सिंग, नितीश रेड्डी, प्रदोष पॉल.

पाकिस्तान अ संघ –

सॅम अय्युब, साहिबजादा फरहान, ओमेर युसूफ, तैयब ताहिर, कासिम अक्रम, मोहम्मद हॅरिस (कर्णधार, यष्टीरक्षक), मुबासिर खान, अमद बट, मोहम्मद वसीम जूनियर, सुफियान मुकीम, अर्शद इक्बाल, हसिबुल्ला खान, मेहरान मुमताज, कामरान गुलाम.

हेही वाचा – IND W vs BAN W: ‘आयसीसी आणि बीसीसीआय यावर…’, हरमनप्रीत कौरच्या एलबीडब्ल्यू आऊटवर स्मृती मानधनाच वक्तव्य

भारत अ विरुद्ध पाकिस्तान अ यांच्यातील उदयोन्मुख आशिया कपचा अंतिम सामना कधी होणार?

रविवारी (२३ जुलै) उभय संघांमधील अंतिम सामना रंगणार असून या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी २:०० वाजता सुरू होईल.

भारत अ विरुद्ध पाकिस्तान अ यांच्यातील उदयोन्मुख आशिया कप फायनल सामना कुठे पाहू शकता?

भारत अ विरुद्ध पाकिस्तान अ अंतिम सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केला जाईल. त्याच वेळी, तुम्ही हा सामना फॅनकोड अॅप आणि वेबसाइटवर ऑनलाइन पाहू शकता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Emerging asia cup 2023 final between ind a vs pak a know when and where to watch the match vbm