नॅशनल एज्युकेशन फाउंडेशनतर्फे (एनइएफ) आयोजित केलेल्या अखिल भारतीय स्तरावरील साहसी क्रीडा स्पर्धेस शनिवारी सुरुवात होत आहे. या स्पर्धेत देशभरातील दोनशे संघांनी भाग घेतला आहे.
या स्पर्धेत मुंबई, पुणे, कोल्हापूर, भोर, नाशिक, अहमदनगर, बंगळुरू, हैदराबाद, नवी दिल्ली, सांगली, पणजी, ठाणे, चेन्नई, परभणी, नारायणगाव आदी ठिकाणच्या सहाशे खेळाडूंनी भाग घेतला आहे. यंदा माहिती तंत्रज्ञान विभागात इन्फोसिस, एसएलके ग्लोबल, कॉग्निझंट टेक्नॉलॉजी, बीएमसी सॉफ्टवेअर, केपीआयटी, आयबीएम, पर्सिस्टंट सिस्टिम्स आदी नामवंत कंपन्यांचा समावेश आहे.
     प्रत्येक स्पर्धकास सव्वाशे किलोमीटर सायकलिंग, पदभ्रमण करावे लागणार आहे. तसेच प्रत्येकास याटिंग, नेमबाजी व रिव्हर क्रॉसिंगही करावे लागणार आहे. या स्पर्धेचे हे अकरावे वर्ष असून ही स्पर्धा प्रामुख्याने पुण्याजवळील पानशेत, सिंहगड व खडकवासला परिसरातील डोंगराळ भागात होणार आहे. ही स्पर्धा खुला गट, हौशी खेळाडू, महाविद्यालयीन खेळाडू, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील स्पर्धक, वैद्यकीय तज्ज्ञ, कनिष्ठ गट, प्रसारमाध्यम व शिक्षक अशा विविध गटात होणार आहे.

Story img Loader