England Beat West Indies in 1st Test: पदार्पणवीर गस अ‍ॅटकिन्सन आणि दिग्गज जेम्स अँडरसन यांच्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा एक डाव आणि ११४ धावांनी पराभव केला. दुसऱ्या डावात १३६ धावा करत वेस्ट इंडिजचा संघ ऑलआऊट झाला. या सामन्यासह इंग्लंडचा महान कसोटी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला संघाने विजयाने निरोप दिला. जेम्स अँडरसनने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाज म्हणून आपली कारकीर्द संपवली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – James Anderson: कोणासमोर गोलंदाजी करणं अवघड? ‘या’ दिग्गज भारतीय खेळाडूचं नाव घेत अँडरसन म्हणाला…

इंग्लंडकडून वेस्ट इंडिजचा एक डाव आणि ११३ धावांनी लाजिरवाणा पराभव

लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. पहिल्या डावात १२१ धावा करून वेस्ट इंडिजचा संघ सर्वबाद झाला होता. प्रत्युत्तरात यजमान इंग्लंडने ३७१ धावा केल्या होत्या. यासह इंग्लंडने पहिल्या डावात २५० धावांची आघाडी मिळवली होती. पण वेस्ट इंडिज संघाच्या फलंदाजी बाजून पुन्हा एकदा निराश करत दुसऱ्या डावात १३६ धावांवर ऑलआऊट झाला.

हेही वाचा – ENG vs WI: जेम्स अँडरसनला वेस्ट इंडिज संघ ‘गार्ड ऑफ ऑनर’ देणार होता पण… खेळाडूने सांगितलं मैदानात नेमकं काय घडलं?

लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंडकडून पदार्पणवीर गस अॅटकिन्सच्या 7 विकेट्सच्या जोरावर वेस्ट इंडिजला केवळ १२१ धावांवर रोखले. प्रत्युत्तरात यजमान संघाने ३७१ धावा केल्या. इंग्लंडकडून फलंदाजी करताना झॅक क्राऊली (७६), ऑली पोप (५७), जो रूट (६८), हॅरी ब्रूक (५०) आणि जेमी स्मिथ (७०) यांनी अर्धशतके झळकावली. अशाप्रकारे इंग्लंडने त्यांच्या डावात २५० धावांची आघाडी घेतली होती.

हेही वाचा – James Andersonने अखेरच्या सामन्यात केला विश्वविक्रम, कसोटी क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिला गोलंदाज

वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावाची सुरुवात खूपच निराशाजनक झाली. संघाने ठराविक अंतराने झटपट विकेट गमावल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत वेस्ट इंडिजने ७९ धावांत ६ विकेट गमावल्या होत्या. त्यामुळेच सामन्याच्आ तिसऱ्या दिवशी इंग्लंडने वेस्ट इंडिजचा दुसरा डाव आटोपला आणि पहिला कसोटी सामना एक डाव आणि १३६ धावांनी जिंकून इंग्लंडने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.