England vs Afghanistan, World Cup 2023: इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तान संघात विश्वचषक २०२३ स्पर्धेचा १३वा सामना खेळला जात आहे. राजधानी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअममध्ये अफगाणी फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना अक्षरशः धू-धू धुतले. नवख्या अफगाणिस्तानने इंग्लंड विजयासाठी २८५ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. या सामन्यात अफगाणिस्तान संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रहमानुल्लाह गुरबाज याने खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. तो विश्वचकात इंग्लंडविरुद्ध अर्धशतक करणारा दुसऱ्या क्रमांकाचा सलामी फलंदाज बनला आहे. त्याने श्रीलंकेचा माजी खेळाडू उपुल थरंगा याचा विक्रम मागे टाकला आहे.

एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये आज इंग्लंडचा सामना अफगाणिस्तानशी होत आहे. इंग्लंड संघाला अफगाणिस्तानला हरवून स्पर्धेत दुसरा विजय नोंदवायचा आहे. त्याचबरोबर गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर असलेल्या अफगाणिस्तानला पहिल्या विजयाचे वेध लागले आहेत. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २८४ धावा केल्या.

Bangladesh Captain Big Statement Ahead of IND vs BAN test Series
IND vs BAN: “ते क्रमवारीत पुढे असले तरी…”, कसोटी मालिकेआधी बांगलादेशच्या कर्णधाराचं भारतीय संघाला आव्हान, नेमकं काय म्हणाला?
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Matthew Short 5 Wickets Haul Becomes the First opening batsman from the Full Member nation to take 5 wickets in T20I
ENG vs AUS: ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीर फलंदाजाने चेंडूसह घडवला इतिहास, T20I मध्ये ही कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू
ENG vs SL 3rd Test Highlights Pathum Nissanka century r
ENG vs SL 3rd Test : पाथुम निसांकांच्या खणखणीत शतकासह श्रीलंकेने संपवला इंग्लंडमधला विजयाचा दुष्काळ
PAK vs BAN Ahmad Shahzad Slams PCB For Pakistan Defeat Against Bangladesh
PAK vs BAN: “माझ्या आयुष्यात पाकिस्तान क्रिकेट इतके खालच्या पातळीवर…” पाकिस्तानच्या माजी खेळाडूने PCBला सुनावलं
Bangladesh beat Pakistan by 10 Wickets 1st Time history of Test Cricket
PAK vs BAN: पाकिस्तानचा घरच्या मैदानावर लाजिरवाणा पराभव, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात बांगलादेशने पहिल्यांदा मिळवला विजय
WTC Points Table ENG vs SL England big stride After 1st test of ENG vs SL Win by 5 Wickets
WTC Points Table: श्रीलंकेचा पराभव करत इंग्लंडची WTC गुणतालिकेत मोठी झेप, पाकिस्तानसह ‘या’ देशांना टाकलं मागे, भारत कितव्या स्थानी?
PAK vs BAN Saud Shakeel Statement on Mohammed Rizwan Really Denied Double Century
PAK vs BAN: मोहम्मद रिझवानचे द्विशतक होण्यापूर्वीच शान मसूदने पाकिस्तानचा डाव का घोषित केला? सौद शकिलचे मोठे वक्तव्य

प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानचा संघ ४९.५ षटकांत सर्वबाद २८४ धावांवर आटोपला. अफगाणिस्तानकडून रहमानउल्ला गुरबाजने सर्वाधिक ८० धावा केल्या. इकरामने ५८ धावांचे योगदान दिले. तर मुजीब आणि इब्राहिमने अनुक्रमे २८ धावा केल्या. इंग्लंडकडून आदिल रशीदने तीन, मार्क वूडने दोन आणि टोपली, लिव्हिंगस्टोन, रूटने प्रत्येकी एक विकेट घेतली. दिल्लीच्या खेळपट्टीवर इंग्लंडला २८५ धावांचे लक्ष्य गाठणे खूप सोपे जरी वाटत असले तरी अफगाणी फिरकीसमोर त्यांना धावा करताना संघर्ष करावा लागू शकतो.

इंग्लंडविरुद्ध गुरबाजने केला नवीन विक्रम

अफगाणिस्तानकडून डावाची सुरुवात करण्यासाठी रहमानुल्लाह गुरबाज आणि इब्राहिम जादरान खेळपट्टीवर उतरले होते. गुरबाजने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी केली होती. त्याने आदिल रशीद टाकत असलेल्या डावाच्या ११व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर चौकार खेचत अवघ्या ३३ चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या या खेळीत २ षटकार आणि ७ चौकारांचा समावेश होता. हे त्याचे एकदिवसीय प्रकारातील तिसरे अर्धशतक होते. या अर्धशतकाने त्याने खास विक्रम केला.

अफगाणिस्तानसाठी ही भागीदारी विश्वचषकातील सर्वात मोठी सलामीची भागीदारी ठरली आहे. गुरबाज विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध अर्धशतक करणारा दुसऱ्या क्रमांकाचा युवा सलामी फलंदाज ठरला. त्याने २१ वर्षे आणि ३२१ वयात हा पराक्रम केला. त्याच्याआधी या विक्रमात अव्वलस्थानी नामीबियाचा जोहान्स बर्गर असून त्याने २००३च्या विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध २१ वर्षे आणि १७८ वयात अर्धशतक केले होते. यांच्या व्यतिरिक्त यादीत तिसऱ्या स्थानी श्रीलंकेचा माजी सलामीवीर उपुल थरंगा असून त्याने २००७च्या विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध २२ वर्षे आणि ६१ दिवसांच्या वयात अर्धशतक करण्याचा कारनामा केला होता.

हेही वाचा: IND vs PAK: “हा पराभव भयावह आहे…” पाकिस्तान क्रिकेटचे माजी अध्यक्ष रमीझ राजांनी बाबर अँड कंपनीवर साधला निशाणा

दोन्ही संघातील ११ खेळत आहे

इंग्लंड: जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), डेव्हिड मलान, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड, रीस टोपली.

अफगाणिस्तान: रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम जादरान, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, अजमतुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी.