England vs Afghanistan, World Cup 2023: राजधानी दिल्लीत आज अफगाणिस्तानने इंग्लंडविरुद्ध ऐतिहासिक विजयाची नोंद केली. इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील दोलायमान होत असलेल्या सामन्यात माजी विश्वविजेत्यांना चारीमुंड्या चीत करत अफगाणी खेळाडूंनी ६९ धावांनी रोमहर्षक विजय नोंदवला. विश्वचषक २०२३मधील हा पहिला धक्कादायक निकाल आहे. अफगाणिस्तानचा वर्ल्डकप स्पर्धेतला हा केवळ दुसराच विजय आहे. २०१५ वर्ल्डकप स्पर्धेत त्यांनी स्कॉटलंडला नमवलं होतं. इंग्लंडला वर्ल्डकप स्पर्धेत आतापर्यंत बांगलादेश विरुद्ध दोनवेळा आयर्लंड, झिम्बाब्वे आणि आता अफगाणिस्तानविरुद्ध पराभव पत्करावा लागला आहे.

एकदिवसीय विश्वचषकाच्या १३व्या सामन्यात अफगाणिस्तानने इंग्लंडचा ६९ धावांनी पराभव करत अफलातून विजय नोंदवला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानचा संघ ४९.५ षटकांत सर्वबाद २८४ धावांवर आटोपला. इंग्लंडसमोर विजयासाठी २८५ धावांचे लक्ष्य होते, परंतु त्यांचा संपूर्ण संघ ४०.३ षटकांत २१५ धावांत सर्वबाद झाला.

ENG vs SL 3rd Test Highlights Pathum Nissanka century r
ENG vs SL 3rd Test : पाथुम निसांकांच्या खणखणीत शतकासह श्रीलंकेने संपवला इंग्लंडमधला विजयाचा दुष्काळ
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Pakistan Creates Unwanted Record Becomes 2nd Team to Lose 20 Consecutive Test Matches At Home
PAK vs BAN: पाकिस्तानच्या नावे कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील लाजिरवाणा रेकॉर्ड, घरच्या मैदानावरचं केला नकोसा विक्रम
Babar Azam Retirement From Test Cricket Fake Post Goes Viral on Social Media
PAK vs BAN: पाकिस्तानच्या पराभवानंतर बाबर आझमने कसोटीमधून घेतली निवृत्ती? व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Mushfiqur Rahim player of match prize money donates
PAK vs BAN : पाकिस्तानविरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर मुशफिकर रहीमने घेतला मोठा निर्णय, जिंकली चाहत्यांची मनं
PAK vs BAN Mohammed Rizwan Broke Rishabh Pant and Andy Flower Record
PAK vs BAN: मोहम्मद रिझवानने मोडला ऋषभ पंतचा विक्रम, पराभूत कसोटी सामन्यात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला पाकिस्तानी यष्टिरक्षक
Pakistan drop in the World Test Championship table after defeat against Bangladesh
PAK vs BAN : पाकिस्तानची बांगलादेशविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर क्रिकेट विश्वात फजिती! डब्ल्यूटीसी गुणतालिकेतही घसरण
Bangladesh beat Pakistan by 10 Wickets 1st Time history of Test Cricket
PAK vs BAN: पाकिस्तानचा घरच्या मैदानावर लाजिरवाणा पराभव, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात बांगलादेशने पहिल्यांदा मिळवला विजय

इंग्लंडचा लाजिरवाणा पराभव

अफगाणिस्तानने १३व्या विश्वचषकात अनपेक्षितपणे इंग्लंडवर विजय मिळवत क्रिकेट विश्वात सर्वांनाच धक्का दिला. त्यांनी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर गतविजेत्या इंग्लंडचा पराभव करून मोठा विजय संपादन केला. अफगाणिस्तान संघाने हा सामना ६९ धावांनी जिंकला. २०१५च्या विश्वचषकानंतर स्पर्धेतील त्यांचा हा पहिलाच विजय आहे. त्याचबरोबर इंग्लंडला १२ वर्षात दुसऱ्यांदा भारतीय भूमीवर दुसरा मोठा झटका बसला आहे. २०११च्या विश्वचषकात आयर्लंडने बंगळुरूमध्ये त्यांचा आश्चर्यकारक पराभव करून एकच खळबळ निर्माण केली होती. अफगाणिस्तानने विश्वचषक स्पर्धेत प्रथमच कसोटी खेळणाऱ्या देशाचा पराभव केला आहे. यापूर्वी त्याने २०१५ मध्ये स्कॉटलंडचा पराभव केला होता.

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानचा संघ ४९.५ षटकांत सर्वबाद २८४ धावांवर आटोपला. इंग्लंडसमोर विजयासाठी २८५ धावांचे लक्ष्य होते, परंतु त्यांचा संपूर्ण संघ ४०.३ षटकांत २१५ धावांत सर्वबाद झाला.

फिरकीपटूंसमोर इंग्लिश फलंदाज पराभूत झाले

अफगाणिस्तानच्या फिरकी गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. अनुभवी राशिद खान आणि मुजीब उर रहमान यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. त्याचवेळी ऑफस्पिनर मोहम्मद नबीने दोन विकेट्स आपल्या नावावर केल्या. राशिद, मुजीब आणि नबी यांनी मिळून इंग्लंडचे कंबरडे मोडले. फजलहक फारुकी आणि नवीन-उल-हक यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

राशिदने शेवटची विकेट घेतली

राशिद खानने इंग्लंडच्या डावातील १०वी विकेट घेतली. त्याने ४१व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर मार्क वुडला क्लीन बोल्ड केले. वुडने २२ चेंडूत १८ धावा केल्या. रीस टॉपली १५ धावा करून नाबाद राहिला.

हेही वाचा: World Cup 2023: “बुमराहला टाळायचे असेल तर निवृत्ती…”, ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराने केले आश्चर्यचकित करणारे विधान

हॅरी ब्रूकशिवाय एकही फलंदाज अफगाणी फिरकीपटूंसमोर टिकू शकला नाही

इंग्लंडकडून हॅरी ब्रूकने सर्वाधिक ६६ धावा केल्या. तो वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी खेळता आली नाही. डेव्हिड मलानने ३२, आदिल राशिदने २०, मार्क वुडने १८, रीस टॉपलीने नाबाद १५ आणि जो रूटने ११ धावा केल्या. लियाम लिव्हिंगस्टोन आणि सॅम करन यांनी प्रत्येकी १० धावा केल्या. कर्णधार जोस बटलर आणि ख्रिस वोक्स यांनी प्रत्येकी ९ धावा केल्या. सलामीवीर जॉनी बेअरस्टो २ धावा करून बाद झाला.