ENG vs AUS Liam Livingstone smashed 28 runs in one over of Mitchell Starc video viral : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनच्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळला गेला. ज्यामध्ये पावसाच्या व्यत्यानंतर इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा १८६ धावांनी सर्वात मोठा पराभव केला. या सामन्यातील प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडच्या डावातील शेवटचे षटक सर्वात रोमांचक ठरले, ज्यात मिचेल स्टार्कविरुद्ध लायम लिव्हिंगस्टोनने ६ चेंडूत २८ धावा केल्या. यासह, स्टार्कने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपल्या नावावर एक लाजिरवाणा विक्रमही नोंदवला. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

लिव्हिंग्स्टोनने स्टार्कच्या षटकात ४ षटकार आणि एक चौकार मारला –

मिचेल स्टार्कला ऑस्ट्रेलियन कर्णधाराने डावातील शेवटचे षटक टाकण्याची जबाबदारी दिली होती, ज्यामध्ये पहिल्या चेंडूवर लिव्हिंगस्टोनने लाँग ऑनच्या दिशेने षटकार ठोकला. यानंतर स्टार्कने दुसऱ्या चेंडूवर एकही धाव दिली नाही. ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर लिव्हिंगस्टोनने त्याला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार ठोकला. चौथा चेंडू फुल्ल टॉस आला, ज्यावर लिव्हिंगस्टोनने लाँग ऑफच्या दिशेने पुन्हा षटकारासाठी गेला पाठवला. पाचव्या चेंडूवरही त्याने षटकार मारला आणि शेवटच्या चेंडूवर लिव्हिंगस्टोनने बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चौकार मारला. अशा प्रकारे या षटकात एकूण २८ धावा झाल्या. मिचेल स्टार्कच्या एकदिवसीय कारकिर्दीतील हे आतापर्यंतचे सर्वात महागडे षटक तर होतेच, त्याचबरोबर हे कोणत्याही ऑस्ट्रेलियन गोलंदाजचे वनडे इतिहासातील सर्वात महागडे षटक होते.

raja hindustani budget and box office collection
फक्त ६ कोटींचे बजेट असलेल्या सिनेमाने कमावलेले ७६ कोटी, तुम्ही पाहिलाय का २८ वर्षांपूर्वीचा ‘हा’ सुपरहिट चित्रपट?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Earnings of the sequel Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 mumbai
दोन ‘सिक्वेल’च्या घवघवीत यशाने चित्रपटसृष्टीची दिवाळी गोड
Sanju Samson reach 39th position in ICC T20I rankings
Sanju Samson : संजू सॅमसनची आयसीसी टी-२० क्रमवारीत मोठी झेप! सलग दोन सामन्यात शतक झळकावत पटकावले ‘हे’ स्थान
tom cruise mission impossible 8 teaser released
Video : खोल समुद्रातील मिशन अन् जबरदस्त अ‍ॅक्शन; टॉम क्रूझच्या ‘Mission Impossible 8’ चा टीझर प्रदर्शित; सिनेमाची रिलीज डेटही ठरली
shaktimaan arriving soon mukesh khanna
भारताचा पहिला सुपरहीरो ‘शक्तिमान’ पुन्हा येतोय प्रेक्षकांच्या भेटीला; कोण साकारणार मुख्य भूमिका? जाणून घ्या
Jos Buttler hit 115 meter longest six out of stadium
Jos Buttler : जोस बटलरने मारला वर्षातील सर्वात लांब षटकार, चेंडू स्टेडियमच्या बाहेर गेल्याने गोलंदाजासह चाहतेही अवाक्, VIDEO व्हायरल
IND vs SA Ryan Rickelton's 104 Metre Six man ran away with ball video viral
IND vs SA सामन्यात रायन रिकेल्टनने हार्दिक पंड्याला षटकार मारताच प्रेक्षकाने केलं असं काही की… VIDEO होतोय व्हायरल

या सामन्यात स्टार्कने एकूण ७० धावा दिल्या –

या सामन्यात मिचेल स्टार्कची गोलंदाजी खूपच खराब राहिली. ज्यात त्याने ८ षटकात एकूण ७० धावा दिल्या, परंतु त्याला एकही विकेट घेता आली नाही. या सामन्यात स्टार्कशिवाय इतर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची कामगिरीही अपेक्षेप्रमाणे झाली नाही, ज्यामध्ये ॲडम झाम्पाने ६६ आणि शॉन ॲबॉटने ६२ धावा दिल्या. या सामन्यात इंग्लंडसाठी हॅरी ब्रूकने सर्वाधिक धावांचे योगदान दिले. त्याने ५८ चेंडूत ११ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ८७ धावा केल्या. त्याबरोबर लायम लिव्हिंगस्टोनने २७ चेंडूत ७ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने नाबाद ६२ धावांची वादळी खेळी साकारली.

हेही वाचा – पहिला दिवस पावसाचा; केवळ ३५ षटकांचा खेळ; बांगलादेश ३ बाद १०७

लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई केली. त्यामुळे इंग्लंडचा संघ ३९ षटकांत ५ गडी गमावून ३१२ धावा करू शकला. याला प्रत्युत्तर म्हणून ऑस्ट्रेलियन संघ फलंदाजीसाठी उतरला, तेव्हा इंग्लंडच्या गोलंदाजांनी धुमाकूळ घातला. ऑस्ट्रेलियन फलंदाज इंग्लिश गोलंदाजांसमोर झुंजताना दिसले. यामुळेच ऑस्ट्रेलियाचा संघ अवघ्या १२६ धावांत गारद झाला. यासह ऑस्ट्रेलियाला वनडेतील सर्वात मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा १८६ धावांनी पराभव केला. तसेचट धावांच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा हा चौथा सर्वात मोठा पराभव आहे. लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या आठ एकदिवसीय सामन्यांमधील ऑस्ट्रेलियाचा हा दुसरा पराभव आहे.

हेही वाचा – IND vs BAN: रविचंद्रन अश्विनच्या नावे ऐतिहासिक कामगिरी, अनिल कुंबळेंचा ‘हा’ मोठा विक्रम मोडत ठरला नंबर वन

ऑस्ट्रेलियाचे वनडे सामन्यातील सर्वात मोठे पराभव (धावांच्या बाबतीत) –

२४१ विरुद्ध इंग्लंड, नॉटिंगहॅम, २०१८
२०६ विरुद्ध न्यूझीलंड, ॲडलेड, १९८६
१९६ विरुद्ध दक्षिण आफ्रिका, केप टाउन, २००६
१८६ विरुद्ध इंग्लंड, लॉर्ड्स, २०२४*