Stuart Broad is worried about losing the series against Australia: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघांत ॲशेस मालिकेतील चौथा सामना मँचेस्टर येथे खेळला जात आहे. चोथ्या दिवशी पावसाने इंग्लंडच्या मालिका वाचवण्याच्या आशेवर पाणी फेरले. दिवसभरात केवळ ३० षटकेच खेळता आली आणि सकाळचा खेळ आणि शेवटचे सत्र पावसामुळे वाया गेले. पाचव्या आणि शेवटच्या दिवशीही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, ज्यामुळे सामना रोमांचक टप्प्यावर आला आहे. इंग्लंड संघ सध्या १-२ ने पिछाडीवर आहे, अशा स्थितीत पावसामुळे मालिका गमवावी लागण्याची भीती त्यांना सतावत आहे.
स्टुअर्ट ब्रॉडला सतावत आहे चिंता –
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने डेली मेलमध्ये लिहिले, ‘चेंजिंग रूममध्ये बसून पाऊस पाहत विचार करत होतो की, जर सामन्याचा निकाल पावसामुळे लागला तर ते योग्य होणार नाही. मला कधीच वाटले नाही की आम्ही मालिकेतून बाहेर पडलो आहोत, एजबॅस्टन येथे आम्ही चांगला खेळ केला, पण ऑस्ट्रेलियाचा विजय झाला.’
ऑस्ट्रेलियाला हरवण्याची ताकद इंग्लंडमध्ये आहे –
या खेळाडूने पुढे लिहिले की, ‘ऑस्ट्रेलियाला लॉर्ड्स कसोटीसह पहिल्या दोन सामन्यांमध्ये यश मिळाले. पण दुसऱ्या कसोटीत बेन स्टोक्सच्या खेळीने आमची ताकद दाखवून दिली. करो या मरोच्या परिस्थितीत ४३ धावा करणे ही एक मोठी गोष्ट होती, ज्यामुळे आम्हाला काय करायचे आहे याची जाणीव झाली. स्कोअर २-२ होऊ शकतो आणि मालिका छान होईल. ओव्हलवर सामना असताना मालिका बरोबरीत राहावी अशी आमची इच्छा आहे.’
हेही वाचा – विश्वचषकाच्या प्रोमो VIDEO मधून बाबर आझमला वगळल्याने शोएब अख्तर संतापला; आयसीसीवर टीका करताना म्हणाला…
पावसामुळे मँचेस्टर कसोटी विस्कळीत झाली आहे –
शनिवारी संततधार पाऊस असूनही दुपारी २.४५ वाजता सामना सुरू झाला. ऑस्ट्रेलियाने चार विकेट्सवर ११३ धावा करून पुढे खेळण्यास सुरुवात केली. लाबुशेन आणि मिचेल मार्श यांच्यातील १०३ धावांच्या भागीदारीमुळे यजमान संघाच्या सामना जिंकण्याच्या आशा धुळीस मिळत होत्या. लाबुशेनने ११ धावांची खेळी खेळली. जर ऑस्ट्रेलियाने हा सामना २-१ ने ड्रॉ केला, तर ते अॅशेस मालिकेत आपले वर्चस्व कायम ठेवतील. पंचांनी वेगवान गोलंदाजांना गोलंदाजी करण्यापासून रोखल्याने रूट खराब प्रकाशात गोलंदाजी करत होता. यादरम्यान लाबुशेनला ९३ धावांवर जीवदान मिळाले.
इंग्लंडसाठी विजयी समीकरण?
या सामन्यात इंग्लंड सध्या मजबूत स्थितीत आहे. सामना झाला तर त्यांना ऑस्ट्रेलियाच्या उरलेल्या पाच विकेट्स घ्याव्या लागतील. त्यानंतर जे काही लक्ष्य मिळेल ते त्यांना बेसबॉल शैलीत लवकरात लवकर गाठावे लागेल. या सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात ५९२ धावा केल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावात ३१७ धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या डावात ५ बाद २१४ धावा केल्या आहेत.