Ashes Series 2023 England Vs Australia 4th Test 2nd Day: ॲशेस मालिकेतील चौथा कसोटी सामना मँचेस्टर येथे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळला जात आहे. या सामन्यातील दुसरा दिवस गुरुवारी पार पडला. दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या दोन खेळाडूंनी इतिहास रचला. पहिल्यांदा मोईन अलीने ३००० कसोटी धावा आणि २०० कसोटी विकेट्सचा आकडा पार केला. त्याचबरोबर, सलामीवीर जॅक क्रॉलीने ॲशेस कसोटीत इंग्लंडकडून एका दिवसात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
या प्रकरणात, टिप फॉस्टर पहिल्या आणि वॅली हॅमंड दुसऱ्या क्रमांकावर आहे. टिप फॉस्टरने १९०२ मध्ये सिडनी येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात एका दिवसात २१४ धावा केल्या होत्या. वॉली हॅमंडने १९३८ मध्ये लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात एका दिवसात २१० धावा केल्या होत्या. आता मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डवर झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात जॅक क्रॉली १८९ धावा करून बाद झाला.
जॅक क्रॉलीने १८२ चेंडूचा सामना करताना २१ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १८९ धावा केल्या. त्याचबरोबर जॅक क्रॉलीने (५४ धावा) मोईन अलीसह (५४ धावा) १५२ चेंडूत १२१ धावांची भागीदारी केली. यानंतर त्याने जो रूटसोबत तिसऱ्या विकेटसाठी १७८ चेंडूंत २०६ धावांची भागीदारी केली. जॅक क्रोली, मोईन अली, जो रूटच्या जोरावर इंग्लंडने चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ६७ धावांची आघाडी घेतली.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने ७२ षटकांत ४ गडी गमावून ३८४ धावा केल्या होत्या. हॅरी ब्रूकने नाबाद १४ आणि कर्णधार बेन स्टोक्सने २४ धावा केल्या. मोईन अली ५४ आणि जो रूटने ८४ धावा करून बाद झाले. मोईन अलीला मिचेल स्टार्कने आणि जो रूटला जोश हेझलवूडने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
मायदेशात ॲशेस कसोटीत इंग्लंडच्या सलामीवीरांनी केलेली सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या –
३६४ धावा: लेन हटन, द ओव्हल १९३८
१९६ धावा: ग्रॅहम गूच, द ओव्हल १९८५
१९१ धावा: जेफ्री बॉयकॉट, लीड्स १९७७
१८९ धावा: जॅक क्रोली, ओल्ड ट्रॅफर्ड २०२३
इंग्लंडच्या सलामीवीरांची सर्वात जलद शतके –
८६ चेंडू: जॅक क्रोली विरुद्ध पाकिस्तान रावळपिंडी २०२२-२३
९३ बॉल: जॅक क्रोली विरुद्ध ऑस्ट्रेलिया ओल्ड ट्रॅफर्ड २०२३
९५ चेंडू: ग्रॅहम गूच विरुद्ध इंडिया लॉर्ड्स १९९०