Stuart Broad reacts to consecutive sixes hit by Yuvraj Singh: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या ॲशेस मालिकेतील शेवटचा सामना लंडनमध्ये खेळला जात आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडचा हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना आहे. कारण त्याने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर निवृत्ती जाहीर केली. आता स्टुअर्ट ब्रॉडने त्याच्या करिअर आणि रेकॉर्डवर अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. तसेच, त्याने सांगितले की, २००७ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत जेव्हा युवराज सिंगने सलग ६ चेंडूत ६ षटकार मारले होते, या गोष्टीचा त्याच्या कारकिर्दीवर काय परिणाम झाला?

१९ सप्टेंबर २००७ रोजी, किंग्समीड येथे, युवराज सिंगने स्फोटक फलंदाजी करताना, स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात सलग ६ षटकार ठोकले आणि केवळ १२ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते. स्टुअर्ट ब्रॉड आजपर्यंत तो दिवस कदाचितच विसरला असेल. अलीकडेच पत्रकार परिषदेत त्यांनी या दिवसाची आठवण करून दिली आणि हा दिवस त्यांच्यासाठी सर्वात कठीण असल्याचे सांगितले.

Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
how many press conference taken by dr manmohan singh
Dr. Manmohan Singh Death: डॉ. मनमोहन सिंग यांनी १० वर्षांत किती पत्रकार परिषदा घेतल्या? पंतप्रधान मोदींशी याची तुलना का केली जाते?
Statement of Shailesh Lodha of Taarak Mehta Ka Ooltah Chashma fame about life Pune print news
तारक मेहता का उल्टा चष्मा फेम शैलेश लोढा म्हणाले, आयुष्य म्हणजे…
IND vs AUS Ricky Ponting statement on Virat Kohli and Sam Konstas argument at MCG
IND vs AUS : “त्याने टक्कर होण्यास…”, विराट-कॉन्स्टासच्या धक्काबुकीवर प्रकरणावर रिकी पॉन्टिंगचे मोठे वक्तव्य
Sam Konstas hit six against Jasprit Bumrah after 4483 balls in IND vs AUS Boxing Day Test at Melbourne match
IND vs AUS : सॅम कॉन्स्टासने जसप्रीत बुमराहविरुद्ध षटकार लगावत लावली विक्रमांची रांग! पाहा संपूर्ण यादी
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर
Vinod Kambli Message to Sachin Tendulkar
Vinod Kambli : विनोद कांबळीचं वक्तव्य, “मी मरणार नाही, सचिनला निरोप द्या, मी लवकरच…”

अनुभवी इंग्लिश वेगवान गोलंदाज म्हणाला, “तो खरोखर कठीण दिवस होता. मी कदाचित २१ किंवा २२ वर्षांचा असेन. मात्र, तेव्हा मी दबाव हाताळायला शिकलो नव्हतो. त्यावेळी मला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव फारच कमी होता. मात्र, तेव्हापासून मी खूप मेहनत केली आणि स्वत:ला योद्धा बनवायला सुरुवात केली.”

हेही वाचा – ENG vs AUS 5th Test: इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला ऑस्ट्रेलिया संघाने दिला ‘गार्ड ऑफ ऑनर’, पाहा VIDEO

खेळाडूच्या आयुष्यात चढ-उतार येत राहतात – स्टुअर्ट ब्रॉड

स्टुअर्ट ब्रॉड पुढे म्हणाला, “कोणत्याही खेळाडूला चढ-उतारांचा सामना नक्कीच करावा लागतो. आम्ही बेन स्टोक्सची कारकीर्दही खूप जवळून पाहिली आहे. प्रत्येकाला या गोष्टीला सामोरे जावे लागते, हे आपल्या सर्वांना माहित आहे.”

स्टुअर्ट ब्रॉडची कारकीर्द कशी राहीली?

कसोटी सामन्यांव्यतिरिक्त स्टुअर्ट ब्रॉडने इंग्लंडकडून एकदिवसीय आणि टी-२० सामने खेळले आहेत. मात्र, स्टुअर्ट ब्रॉड कसोटी क्रिकेटपटू म्हणून खूप यशस्वी ठरला. याशिवाय एकदिवसीय आणि टी-२० फॉरमॅटमध्येही त्याने आपली छाप सोडली. स्टुअर्ट ब्रॉडने १६७ कसोटी सामन्यांमध्ये २७.६७ च्या सरासरीने आणि ५५.७७ च्या स्ट्राइक रेटने ६०२ विकेट्स घेतल्या आहे. तसेच स्टुअर्ट ब्रॉडने १२१ एकदिवसीय सामन्यांमध्ये १७८ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय स्टुअर्ट ब्रॉडच्या नावावर ५६ टी-२० सामन्यात ६५ विकेट्स आहेत.

Story img Loader