Ollie Robinson on Ashes Series 2023: इंग्लंडचा आघाडीचा वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सन बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन येथे पहिल्या अ‍ॅशेस कसोटीदरम्यान दोन भिन्न शूज परिधान करताना दिसला, त्याचे काही फोटो सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहेत. माहितीसाठी की, अ‍ॅशेस २०२३च्या आधी, तो कौंटी चॅम्पियनशिपमध्ये खूप अस्वस्थ दिसला होता. त्याच्या डाव्या घोट्याला थोडा त्रास होत होता. मात्र, ऑली रॉबिन्सनला ऑस्‍ट्रेलियाविरुद्ध अ‍ॅशेस २०२३च्‍या पहिल्‍या कसोटीत खेळण्‍याची इंग्लंडच्या फिजिओने परवानगी दिली आहे.

सामन्यादरम्यान, ओली रॉबिन्सन दोन्ही पायात दोन वेगळे बूट घातलेला दिसला, जे पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. मात्र, त्याला ही दुखापत सामन्यापूर्वी झाल्याने त्याने अशाप्रकारचे दोन्ही पायात दोन वेगवेगळे बूट घातले, असे काही माजी इंग्लंडच्या खेळाडूंचे म्हणणे आहे.

वास्तविक रॉबिन्सन दोन भिन्न शूज घालून मैदानावर पोहोचला. त्याच्या एका पायात पांढऱ्या रंगाचा आणि दुसऱ्या काळ्या रंगाचा बूट होता. निऑन आणि पांढऱ्या रंगाच्या कॉम्बिनेशनचे त्याने बूट घातले होते. रॉबिन्सनचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे रॉबिन्सनने ऑस्ट्रेलियन फलंदाज उस्मान ख्वाजाला बाद केले. ख्वाजा १४१ धावा करून बाद झाला. त्याने ३२१ चेंडूंचा सामना करत १४ चौकार आणि ३ षटकार ठोकले.

हेही वाचा: IND vs WI: वसीम जाफरने ‘या’ युवा खेळाडूंना विंडीज दौऱ्यात समावेश करण्याची BCCIला केली सूचना; म्हणाला, “रोहित-विराट ऐवजी…”

तिसऱ्या दिवशी पाऊस सामन्यात खोडा घालू शकतो

विशेष म्हणजे, जो रूटने इंग्लंडकडून पहिल्या डावात नाबाद शानदार शतक झळकावले, त्याने ११८ धावा केल्या. जॅक क्रॉलीने ६१ धावांची खेळी करत त्याला साथ दिली. इंग्लंडच्या संघाने ३९३ धावा करून डाव घोषित केला होता. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद ३८६ धावा केल्या. ख्वाजाने १४१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. इंग्लंडची दुसऱ्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात इंग्लिश संघाने २ विकेट्सच्या मोबदल्यात तिसऱ्या दिवसअखेर २८ अशी झाली आहे. जॅक क्रॉली अवघ्या ७ धावा करून बाद झाला असून डकेटने १९ धावा केल्या. त्याने २८ चेंडूंचा सामना करताना एक चौकार मारला. आज चौथ्या दिवसाचा खेळ होणार आहे. मात्र, चौथ्या दिवशीही पावसाची शक्यता असल्याने किती षटके खेळली जातील हे आत्ताच सांगता येणे कठीण आहे. तिसऱ्या दिवशी पावसामुळे सामना दोनदा थांबवण्यात आला.

Story img Loader