Ollie Pope Ruled Out, Ashes 2023: २०२३ची अ‍ॅशेस मालिका इंग्लंड क्रिकेट संघासाठी आतापर्यंत काही खास राहिलेली नाही. यजमान इंग्लंड आतापर्यंत सुरुवातीच्या दोन कसोटी सामन्यात पराभूत झाल्यानंतर मालिकेत २-०ने पिछाडीवर आहे. मालिकेतील पुढचा सामना गुरुवारपासून (६ जुलै) हेडिंग्ले येथे खेळवला जाणार आहे, ज्यामध्ये इंग्लिश संघाला कोणत्याही किंमतीवर विजय मिळवावा लागेल, मात्र त्याआधीच इंग्लिश संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. खरं तर, इंग्लंड क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज आणि उपकर्णधार ओली पोप खांद्याच्या दुखापतीमुळे २०२३च्या अ‍ॅशेस मालिकेतून बाहेर पडला आहे.

लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना ओली पोपला दुखापत झाली होती, मात्र दुखापत असूनही ओली पोपने आपल्या संघासाठी कठीण वेळी दोन्ही डावांत फलंदाजी केली. इंग्लंड क्रिकेटचा उपकर्णधार सामन्याच्या तिसऱ्या दिवशी मैदानात उतरला, पण त्यानंतर त्याची दुखापत गंभीर होत गेली. ओली पोपच्या दुखापतीचे गांभीर्य लंडनमध्ये सोमवारी स्कॅन केले असता उघड झाले. दुखापतीतून बरे होण्यासाठी पोपला शस्त्रक्रियेची आवश्यकता होती, ज्यामुळे तो उर्वरित अ‍ॅशेस मालिकेतून बाहेर पडला आहे.

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Dabbawala, Dabbawala backs Uddhav Thackeray,
मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) पाठीशी
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर
icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द
maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर

लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या दिवशी क्षेत्ररक्षणात चेंडू रोखण्याच्या प्रयत्नात ऑली पोपला दुखापत झाली होती. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पोपची दुखापत वाढली कारण अंपायरने इंग्लंडच्या पहिल्या डावात फलंदाजीसाठी मैदानात उतरण्याचा त्याला आग्रह धरला. पोपने पहिल्या डावात ४२ धावा केल्या. इंग्लंडचे फिरकी प्रशिक्षक जीतन पटेल यांनी मान्य केले होते की, ते आले नसते तर इंग्लंडला १० खेळाडूंसह मैदानात उतरावे लागले असते.

दोन्ही सामन्यांमध्ये पोपची कामगिरी अशीच होती

ऑली पोपने अॅशेसमध्ये खेळल्या गेलेल्या २ सामन्यात ४ डावात फलंदाजी करताना २२.५०च्या सरासरीने ९० धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून एकूण ८ चौकार आले. इंग्लिश संघाच्या या खेळाडूला मदत करण्यासाठी इंग्लंड आणि ‘सरे मेडिकल टीम’ एकत्र काम करतील. ऑली पोपला ऍशेसमधून बाहेर काढण्यात आले आहे, परंतु इंग्लंड क्रिकेट संघाने त्याच्या बदलीची घोषणा केलेली नाही. यापूर्वी, अष्टपैलू मोईन अलीलाही एजबॅस्टन कसोटीत दुखापत झाली होती, त्यानंतर तो लॉर्ड्स कसोटीचा भाग होऊ शकला नाही. अशा स्थितीत खेळाडूंना होणाऱ्या दुखापतींमुळे कर्णधार बेन स्टोक्सच्या अडचणी खूप वाढल्या आहेत.

हेही वाचा: Rohit Sharma: वेस्ट इंडीजला जाताच हिटमॅनने बदलला लूक, तुम्हीच पाहा आणि ओळखा; फोटो व्हायरल

आतापर्यंत आंतरराष्ट्रीय कारकीर्द

ऑली पोप फक्त इंग्लंडकडून कसोटी क्रिकेट खेळतो. ऑगस्ट २०१८ मध्ये लॉर्ड्सवर भारताविरुद्ध त्याने कसोटी पदार्पण केले. त्याने आतापर्यंत ४८ कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या ६७ डावांत फलंदाजी करताना पोपने ३४.४५च्या सरासरीने २१३६ धावा केल्या. यादरम्यान त्याने १ द्विशतक आणि ४ शतके झळकावली. तसेच त्याने आतापर्यंत ११ अर्धशतके ठोकली आहेत.