ENG vs AUS, Ashes 2023: अॅशेस मालिका २०२३च्या दुसर्या कसोटीतील उद्भवलेल्या वादानंतर ऑस्ट्रेलियन आणि इंग्लंड मीडिया यांच्यात सध्या द्वंद्व युद्ध पाहायला मिळत आहे. लॉर्ड्सवरील दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला ४३ धावांनी पराभूत केल्यानंतर, एका ऑस्ट्रेलियन दैनिकाने इंग्लिश क्रिकेट संघाची खिल्ली उडवली आणि नवीन चेंडूजवळ बेन स्टोक्सच्या छायाचित्रासह त्यांना ‘क्राय बेबी’ (Stokes Cry baby) म्हटले आहे. यावर आता इंग्लिश कर्णधाराने जोरदार प्रत्युत्तर दिले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील लॉर्ड्स कसोटी सामन्यापासून जॉनी बेअरस्टोच्या वादग्रस्त बाद झाल्याची चर्चा वेगळ्याच पातळीवर पोहोचली आहे. ऑस्ट्रेलियन संघाला इंग्लिश मीडिया संस्थांनी लक्ष्य केल्यानंतर आता ऑस्ट्रेलियन मीडियानेही इंग्लंड संघाचा कर्णधार बेन स्टोक्सवर निशाणा साधला आहे. याबाबत स्टोक्सने सोशल मीडियावर आपल्या पद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्नही केला आहे. ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राने दिलेल्या या मथळ्यावर बेन स्टोक्सने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, “हे निश्चितपणे मी नाही, मी किती दिवसांपासून नवीन चेंडूने गोलंदाजी करत आहे.”
ऑस्ट्रेलियन वृत्तपत्र ‘द वेस्ट ऑस्ट्रेलियन’ने आपल्या वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर बेन स्टोक्सचा रडणाऱ्या मुलाचा फोटो प्रकाशित केला आहे, ज्याच्या तोंडावर दुधाच्या बाटलीचे निप्पल आहे. या फोटोवर कमेंट करताना स्टोक्सने ट्वीट केले आणि लिहिले की, हा मी अजिबात होऊ शकत नाही. मी नवीन चेंडूने गोलंदाजी करणे कधीच सुरु केले आहे.
या फोटोमागचे कारण म्हणजे सामन्यानंतर जॉनी बेअरस्टोच्या विकेटवर बेन स्टोक्सने टीका केली होती. त्यावेळी मी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा कर्णधार असतो तर त्याने अपील मागे घेतले असते”, असे स्टोक्सने आपल्या वक्तव्यात म्हटले आहे.
जॉनी त्याच्या क्रीजमध्ये होता आणि नंतर आऊट झाला– बेन स्टोक्स
सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेदरम्यान, बेअरस्टोच्या रनआउट होण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर बेन स्टोक्स म्हणाला की, “अंपायरने षटक पूर्ण झाल्याची माहिती कधीच दिली होती. मैदानावरील अंपायरने एक हालचाल केली, ती निर्णायक ओव्हर होती का? मला माहित नाही. जॉनी त्याच्या क्रीजमध्ये होता आणि नंतर सर्व झाल्यावर तो माझ्याशी बोलायला बाहेर आला. लगेचच त्यानंतर कॅरीने त्याला रनआउट केले मग तो बाहेर गेला यावर मी वाद घालू इच्छित नाही.”
आपल्या वक्तव्यात स्टोक्सने पुढे म्हटले आहे की, “जर सामना दुसऱ्या बाजूने लागला असता तर मी अंपायरवर अधिक दबाव टाकला असता आणि त्यांनी षटक संपल्याची घोषणा केली आहे की नाही, असे विचारले असते. मी खेळाच्या भावनेचा गांभीर्याने विचार केला आणि त्याच वेळी मला वाटले, मला हे करायचे आहे का? मला असे सामने जिंकायचे आहेत का? मी उत्तर दिले असते की नाही. असा रडीचा डाव मला खेळायचा नाही, चीटिंग करून आज सामने जिंकणार पण नंतर मात्र तुम्ही जेव्हा स्वतः याचा विचार कराल तेव्हा हे चुकीचे केले होते असे लक्षात येईल आणि वेळ निघून गेली असेल.”