ENG vs BAN, World Cup 2023: इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने मंगळवारी बांगलादेशविरुद्धच्या विश्वचषक सामन्यापूर्वी धरमशाला येथील एचपीसीए स्टेडियमच्या आउटफिल्डवर जोरदार टीका केली. यापूर्वी अफगाणिस्तानचे प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट यांनीही त्यांचा संघ बांगलादेशविरुद्ध सामना खेळलेल्या आऊटफील्डवर टीका केली होती. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत बटलर म्हणाला, “आऊटफिल्डबाबत चिंता होती. माझ्या मते हे एक वाईट आउटफिल्ड आहे. यावर क्षेत्ररक्षण करताना बरीच खबरदारी घ्यावी लागली.”

बटलर म्हणाला, “तुम्हाला एक धाव वाचवण्यासाठी डायव्ह करायचा असतो पण इथे तुम्हाला ते टाळावे लागले. आयपीएलदरम्यान आउटफिल्डचा हा प्रकार दिसत नाही.” अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यादरम्यान अनेक खेळाडू एचपीसीएच्या आउटफिल्डवर दुखापतग्रस्त झाले. बटलर म्हणाला की, “दुखापत कोणत्याही मैदानावर होऊ शकते परंतु ही गोष्ट आधीच मनात राहील जी चांगली नाही. यावर क्षेत्ररक्षण करणे म्हणजे दुखापत करून घेण्यासारखे होते.”

IND vs AUS Paine criticism of Gautam Gambhir ahead Border Gavaskar Trophy
IND vs AUS : ‘… तो भारतीय क्रिकेट संघासाठी योग्य नाही’, रिकी पॉन्टिंगनंतर टिम पेनने गौतम गंभीरवर साधला निशाणा
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
IND vs AUS Sourav Ganguly Says Rohit Sharma should be playing the Perth Test
IND vs AUS : ‘… तर रोहित पुन्हा कधीही ऑस्ट्रेलियाला जाणार नाही’, सौरव गांगुलीचे हिटमॅनबद्दल मोठं वक्तव्य
IND vs SA 3rd T20I Match Stopped Due to Flying Ants engulfed the Centurion Stadium
IND vs SA: ना पाऊस, ना खराब हवामान… चक्क कीटकांनी रोखला भारत-आफ्रिका सामना, मैदानात नेमकं काय घडलं?
india vs south africa 3rd t20I match india eye batting revival against sa at centurion
भारतीय फलंदाजांकडे लक्ष; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा ट्वेन्टी२० सामना आज; सूर्यकुमार, पंड्याकडून अपेक्षा
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’
Suryakumar Yadav video with Pakistani fan goes viral :
Suryakumar Yadav : तुम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात का येत नाही? चाहत्याच्या प्रश्नावर सूर्या म्हणाला, ‘हे आमच्या…’
Ritika Sajdeh salutes Aaron Finch for defending husband Rohit Sharma after Sunil Gavaskar comment
Ritika Sajdeh : सुनील गावस्करांच्या वक्तव्यावर रोहितच्या बायकोची जबरदस्त प्रतिक्रिया, सोशल मीडियावर चाहत्यांचे वेधलं लक्ष

इंग्लंडचा कर्णधार पुढे म्हणाला, “इजा कुठेही होऊ शकते. एचपीसीए स्टेडियममध्ये काही सावधगिरी बाळगणे आवश्यक होते, जे तुम्हाला देशासाठी खेळताना करायचे नव्हते. तुम्हाला तुमचे सर्वस्व देऊन प्रत्येक धाव वाचवायची होती आणि तसे आम्ही केले.” पार्श्वभागाच्या दुखापतीतून सावरणारा बेन स्टोक्स बांगलादेशविरुद्ध खेळणार नसल्याचेही बटलरने सांगितले होते. न्यूझीलंडविरुद्धचा पहिला सामनाही तो खेळू शकला नाही. बांगलादेशचे प्रशिक्षक रंगना हेराथ यांनी सामन्याआधी सांगितले होते की, “आमचे खेळाडू या आउटफिल्डशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतील.”

हेही वाचा: ENG vs BAN, World Cup: माजी विश्वविजेत्यांपुढे बांगला टायगर्स ढेर! इंग्लंडने तब्बल १३७ धावांनी चारली बांगलादेशला धूळ

बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिल्या सामन्यानंतर आयसीसीने ही खेळपट्टी सरासरी म्हणून घोषित केली होती. हेराथ म्हणाला, “आम्ही कोणावरही निर्बंध लादणार नाही कारण जर त्याने तसे केले तर तो त्याचे १०० टक्के देऊ शकणार नाही.” तो पुढे म्हणाला, “गेल्या सामन्यात आम्ही चांगली कामगिरी केली आणि या सामन्यातही असेच केले आहे फक्त यावेळी सामना जिंकला आहे.” हेराथ म्हणाला, “आयसीसीने मैदानावर खूप मेहनत घेतली आहे. त्यावर त्यांनी एकदिवसीय सामने खेळण्याची परवानगी दिली आहे, त्यामुळे माझी त्याबद्दल कोणतीही तक्रार नाही.”

हेही वाचा: PAK vs SL, World Cup: मेंडिस- समरविक्रमाची शानदार शतकं! श्रीलंकेच्या फलंदाजीपुढे पाकिस्तान भुईसपाट, विजयासाठी ठेवले ३४५ धावांचे मोठे आव्हान

इंग्लंडचा बांगलादेशवर मोठा विजय

एकदिवसीय विश्वचषकाच्या सातव्या सामन्यात इंग्लंडने बांगलादेशचा १३७ धावांनी पराभव केला. विश्वचषक स्पर्धेतील त्याचा हा पहिलाच विजय आहे. इंग्लंडला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्याचबरोबर बांगलादेशचा पहिला पराभव झाला आहे. पहिल्या सामन्यात त्याने अफगाणिस्तानचा पराभव केला होता. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने ५० षटकांत नऊ गडी गमावून ३६४ धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ ४८.२ षटकांत सर्वबाद २२७ धावांवर आटोपला.