टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा सूर्यकुमार यादव हा पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे. रविवारी बर्मिंगहॅममध्ये इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी-२० सामन्यात त्याने शतक झळकावले. सूर्यकुमारने ५५ चेंडूत १४ चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने ११७ धावांची अप्रतिम खेळी केली. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शतक ठोकणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी केएल राहुलने हा पराक्रम केला आहे. सूर्यकुमारची ही खेळी टी-२० मध्ये भारताची दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. आता त्याच्या पुढे आता फक्त रोहित शर्मा आहे, ज्याच्या नावावर ११८ धावांच्या खेळीचा विक्रम आहे.

सूर्यकुमारने शतक झळकावताच रोहितचे ११ वर्षांचे ट्विट व्हायरल होत आहे. रोहितने हे ट्विट १० डिसेंबर २०११ रोजी सकाळी ९:३३ वाजता केले होते. यात हिटमॅन रोहित शर्माने सूर्यकुमारचे कौतुक केले होते आणि सांगितले होते की, त्याला भविष्यात मुंबईतून खेळताना बघायचे आहे. “चेन्नईमध्ये नुकताच बीसीसीआय पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहिलो होतो. काही रोमांचक क्रिकेटपटू येत आहेत. मला भविष्यात सूर्यकुमार यादवला मुंबईकडून खेळताना पाहायचे आहे,” असे रोहितने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. सूर्यकुमारने शतक झळकावताच रोहितचे हे ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे.

भारत हरला, पण सूर्यकुमार यादव जिंकला; ब्रिटिश प्रेक्षकांचे स्टँडिंग ओव्हेशन

सूर्यकुमार यादवने भारतीय संघ संकटात असताना दमदार खेळी करून संघाच्या डावाला आकार दिला. त्याच्या खेळीमुळेच भारताला १९८ धावांपर्यंत मजल मारता आली. त्याच्या या कामगिरीसाठी तो बाद झाल्यानंतर भारतीय प्रेक्षकांसोबतच इंग्लंडच्या प्रेक्षकांनीही टाळ्या वाजवून त्याला दाद दिली.

इंग्लंडला व्हाईट वॉश देण्याची संधी हुकली; ट्रेंट ब्रिजवर भारताला स्वीकारावा लागला पराभव

सूर्यकुमारची ११७ धावांची खेळी ही चौथ्या क्रमांकावर आलेल्या खेळाडूंपैकी सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी, टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चौथ्या क्रमांवर येऊन सर्वोत्तम खेळ करण्याचा खेळण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलच्या नावावर होता, ज्याने २०१९ मध्ये बंगळुरू येथे भारताविरुद्ध नाबाद ११३ धावांची खेळी केली होती.