भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने ओव्हल कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात सलामीवीर म्हणून ११,००० धावा पूर्ण केल्या आहेत. सलामीवीर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद ११,००० धावा पूर्ण करण्याच्या बाबतीत तो दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. यात रोहितने ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनचा विक्रम मोडला.

सलामीवीर म्हणून रोहितने २४६ डावांमध्ये ११,००० धावा पूर्ण केल्या. त्याने २५१ डावांमध्ये ११,००० धावा करणाऱ्या हेडनचा विक्रम मोडला. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वात कमी डावात ११,००० धावा पूर्ण करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने २४१ डावांमध्ये ही कामगिरी केली होती.

 

हेही वाचा – ‘‘विराटला चॅलेंज करू नका, तो इंग्लंडमध्ये शर्ट काढून…”, सौरव गागुंलीचे वक्तव्य

याशिवाय रोहितने अजून एका विक्रमाला गवसणी घातली. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५,००० धावा देखील पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा रोहित आठवा भारतीय आहे. राहुल द्रविड, सौरव गांगुली, विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी, वीरेंद्र सेहवाग आणि मोहम्मद अझरुद्दीन हे या यादीतील इतर भारतीय खेळाडू आहेत. रोहितने ३९७ डावांमध्ये १५ हजार आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या आहेत. विराट कोहलीने ३३३ डावांमध्ये आणि सचिन तेंडुलकरने ३५६ डावात ही कामगिरी केली.

 

सध्याच्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत रोहितने उत्तम खेळ दाखवला आहे. केएल राहुलसह रोहितने टीम इंडियाला सर्वोत्तम सलामी दिली आहे. भारतीय संघाची मधली फळी आतापर्यंत काही विशेष करू शकलेली नाही. संघाची बहुतेक फलंदाजी सलामीवीरांवर अवलंबून असते. परदेशी भूमीवर रोहित शर्माचे पहिले कसोटी शतक पाहण्यासाठी चाहते वाट पाहत आहेत.

Story img Loader