भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी मैदानावरील एक दृश्य पाहून सर्वजण स्तब्ध झाले. इंग्लंडचा महान वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन गुडघ्यांना दुखापत होऊनही खेळत राहिला. ३९ वर्षीय अँडरसनची दुखापत इतकी मोठी होती, की त्याच्या गुडघ्यातून रक्तस्राव होत होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भारतीय डावाच्या ४२व्या षटकात ही घटना घडली. यावेळी कर्णधार विराट कोहली (५०) आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे (५) आपला डाव सांभाळण्यात व्यस्त होते. मात्र, अँडरसनला ही दुखापत केव्हा आणि कशी झाली याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. अँडरसनच्या रक्तबंबाळ झालेल्या गुडघ्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. चाहते अँडरसनच्या धैर्याचे कौतुक करत आहेत.

हेही वाचा – T20 World Cup : ‘‘भारताला हरवून आम्ही…”, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचं मोठं वक्तव्य

पहिल्या दिवसअखेर…

केनिंग्टनच्या ओव्हल मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथी कसोटीला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवसअखेर इंग्लंडने पहिल्या डावात ३ बाद ५३ धावा केल्या आहेत. मालिकेत दमदार फॉर्मात असलेला इंग्लंडचा कर्णधार जो रूट मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ख्रिस वोक्स, ओली रॉबिन्सन यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने भारताला ६१.३ षटकात १९१ धावांत गारद केले. सामन्यात संधी मिळालेल्या मुंबईकर शार्दुल ठाकूरचे झटपट अर्धशतक टीम इंडियाला दोनशे धावांच्या जवळ घेऊन गेले. कर्णधार विराट कोहलीने अर्धशतकी योगदान दिले. दुखापतीतून सावरलेल्या ख्रिस वोक्सने ४ बळी घेत आपले पुनरागमन यशस्वी केले आहे. पाच सामन्यांची ही मालिका सध्या १-१ने बरोबरीत आहे.