भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान सध्या दुसरा एकदिवसीय सामना सुरु आहे. या सामन्यात पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे आज दुसऱ्या दिवशी सामना सुरु झाला आणि भारताने सुरुवातीला झटपट दोन गडी गमावले. लॉर्ड्सचे मैदान हे वेगवान स्विंग गोलंदाजांसाठी कायमच पर्वणी असते. त्यामुळे येथे इंग्लंडचे पारडे जड असणार असल्याची शक्यता सामन्याआधीच वर्तवण्यात येत होती. त्यात भर म्हणून वरुणराजाचीदेखील इंग्लंडवर मेहेरनजर असल्याचे एका आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे.

एका आकडेवारीनुसार, पहिल्या दिवसाचा खेळ वाया गेल्यांनतर अद्याप कधीही इंग्लंडच्या संघाने सामना गमावला नसल्याचे पाहण्यात आले आहे. आतापर्यंत इंग्लंडने खेळलेल्या सामन्यांपैकी एकूण ५ सामन्यात पहिल्या दिवसाचा खेळ वाया गेला होता. आणि विशेष म्हणजे या सर्व सामन्यात इंग्लंडचा प्रतिस्पर्धी संघाला पराभव करता आला नव्हता. यापैकी ३ सामने अनिर्णित राहिले आणि २ सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला.

विशेष म्हणजे इंग्लंडने विजय मिळवलेल्या दोनही सामन्यात प्रतिस्पर्धी संघ हा आशियाई होता. इंग्लंडने पाकिस्तानलाच दोंन्ही सामन्यात मात दिली. आणि सध्या सुरु असल्येल्या सामन्यातदेखील भारत हा इंग्लंडविरुद्ध खेळत आहे. त्यामुळे या सामना भारतासाठी कमनशिबी ठरतो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Story img Loader