England vs Netherland ICC Cricket World Cup 2023 Match Updates: विश्वचषक २०२३ च्या ४०व्या सामन्यात आज इंग्लंडचा सामना नेदरलँड्सशी खेळला जात आहे. हा सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे येथे खेळवला जात असून इंग्लंडने नेदरलँड्ससमोर विजयासाठी ३४० धावांचे आव्हान ठेवले आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बेन स्टोक्सने शानदार शतक झळकावत संघाला ३०० पार धावसंख्या उभारण्यात मदत केली. इंग्लंड आणि नेदरलँड्सचा संघ आधीच या विश्वचषकातून बाहेर पडला आहे. नेदरलँड्सचा शेवटचा सामना भारताविरुद्ध होणार आहे.

इंग्लंडने नेदरलँड्ससमोर विजयासाठी ३४० धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत इंग्लंड संघाने ५० षटकांत नऊ गडी गमावून ३३९ धावा केल्या. त्यासाठी अनुभवी फलंदाज बेन स्टोक्सने १०८ धावा केल्या. त्याने ८४ चेंडूंच्या खेळीत सहा चौकार आणि सहा षटकार मारले. स्टोक्सचे हे विश्वचषक इतिहासातील पहिले शतक आहे. डेव्हिड मलानने ८७ आणि ख्रिस वोक्सने ५१ धावा केल्या. जो रूटने २८, जॉनी बेअरस्टोने १५ आणि हॅरी ब्रूकने ११ धावा केल्या. डेव्हिड विली (०६), जोस बटलर (०५) आणि मोईन अली (०४) लवकर बाद झाले. नेदरलँड्सकडून बास डी लीडेने सर्वाधिक तीन गडी बाद केले.

West Indies Beat England with New Record of Highest Successful Chase in in T20I At Home Soil of 219 Runs WI vs ENG
ENG vs WI: वेस्ट इंडिजचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय! संथ सुरूवातीनंतर षटकारांचा पाऊस, कॅरेबियन संघाने मोडला ७ वर्षे जुना विक्रम
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Australia Beat Pakistan by 29 Runs in 7 Over Game PAK vs AUS 1dt T20I Gabba Glenn Maxwell Fiery Inning
AUS vs PAK: ७ षटकांच्या सामन्यातही पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाच्या विजयात मॅक्सवेलची स्फोटक खेळी
India vs South Africa 3rd T20 Highlights in Marathi
IND vs SA 3rd T20 Highlights : रोमहर्षक सामन्यात भारताने मारली बाजी! तिलक वर्माचा शतकी तडाखा, मालिकेत २-१ घेतली आघाडी
IND vs SA 3rd T20 Match Timing Changes India vs South Africa centurion
IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका तिसरा टी-२० सामना दुसऱ्या सामन्यापेक्षा उशिराने सुरू होणार, जाणून घ्या काय आहे नेमकी वेळ?
Jos Buttler hit 115 meter longest six out of stadium
Jos Buttler : जोस बटलरने मारला वर्षातील सर्वात लांब षटकार, चेंडू स्टेडियमच्या बाहेर गेल्याने गोलंदाजासह चाहतेही अवाक्, VIDEO व्हायरल
Sanju Samson breaks Dhoni record to become joint 7th Indian batter
Sanju Samson : संजू सॅमसनने धोनीला मागे टाकत केला खास पराक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला सातवा भारतीय

इंग्लिश संघाने या विश्वचषकात अत्यंत खराब कामगिरी केली असून गुणतालिकेत ते तळाशी आहे. त्याचवेळी नेदरलँड्स नवव्या क्रमांकावर आहे. या सामन्यात इंग्लंडला सावधगिरी बाळगावी लागणार आहे. इंग्लंडला प्रतिष्ठा जपण्यासाठी आणि २०२५च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये थेट पात्र होण्यासाठी आजचा विजय आवश्यक आहे. कारण, या विश्वचषकातील गुणतालिकेनुसार आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पहिले सात संघ थेट पात्र होणार आहेत. उर्वरित संघांना पात्रता फेरीचे सामने खेळणे आवश्यक आहेत. त्यामुळे नेदरलँड्सविरुद्ध इंग्लिश संघाला कुठल्याही परिस्थतीत विजय हा आवश्यक आहे.

तत्पूर्वी, बटलरने प्लेइंग-११ मध्ये दोन बदल केले. हॅरी ब्रूक आणि गस ऍटकिन्सन प्लेइंग-११ मध्ये परतले आहेत. लियाम लिव्हिंगस्टोन आणि मार्क वुड यांना संघातून वगळण्यात आले. त्याचवेळी नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सनेही प्लेइंग-११ मध्ये बदल केला. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टिकोनातून हा सामना खूप महत्त्वाचा आहे. दोन्ही संघ नवव्या आणि दहाव्या स्थानावर आहेत. या विश्वचषकातील अव्वल आठ संघ २०२५ मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरतील. अशा स्थितीत अव्वल आठमध्ये स्थान मिळविण्यावर दोघांचे लक्ष असेल.

हेही वाचा: World Cup 2023: नेदरलँड्स सामन्यापूर्वी अक्षर पटेल टीम इंडियाला भेटला? मोहम्मद सिराजबरोबरचा फोटो व्हायरल

दोन्ही संघ पुढीलप्रमाणे आहेत

इंग्लंड: जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, जोस बटलर (यष्टीरक्षक/ कर्णधार), मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, गस ऍटकिन्सन, आदिल रशीद.

नेदरलँड्स: वेस्ली बॅरेसी, मॅक्स ओ’डॉड, कॉलिन एकरमन, सिब्रांड एंजेलब्रेक्ट, स्कॉट एडवर्ड्स (यष्टीरक्षक/ कर्णधार), बास डी लीडे, तेजा एनडामानुरु, लोगान व्हॅन बीक, रॉल्फ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन.