England vs Netherland ICC Cricket World Cup 2023 Match Updates: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धेतील ४०वा सामना पुण्यातील एमसीए स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात इंग्लंड आणि नेदरलँड्स आमनेसामने आहेत. इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंग्लंड संघाचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जोस बटलरने प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत. हॅरी ब्रूक आणि गस ऍटकिन्सन प्लेइंग इलेव्हनमध्ये परतले आहेत. लियाम लिव्हिंगस्टोन आणि मार्क वुड यांना संघातून वगळण्यात आले आहे. त्याचवेळी नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सनेही प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला.

इंग्लंड दहाव्या स्थानावर आहे –

जर आजचा सामनाही इंग्लंडने हरला तर चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी पात्रता मिळवणे खूप कठीण होईल. २०२३ च्‍या विश्‍वचषकाचे गुण सारणी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्‍पर्धेसाठी पात्र होण्‍यासाठी खूप महत्‍त्‍वाचे आहे. या गुणतालिकेत आठव्या क्रमांकापर्यंतचे संघच चॅम्पियन्स ट्रॉफी खेळू शकणार आहेत. सध्या इंग्लंड दहाव्या स्थानावर आहे. अशा स्थितीत आजचा सामना इंग्लंडने जिंकला तर पुढील सामना जिंकून चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, आजचा सामनाही इंग्लंडने हरला तर चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्रता मिळवणे कठीण होईल.

हेही वाचा – कोहलीचा रेकॉर्ड आणि बॉयफ्रेंडबरोबर प्रेमाचं नातं एकत्रचं तुटलं; तरुणीच्या हातातलं ब्रेकअप पोस्टर पाहिलं का?

दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा सामना –

विश्वचषकाच्या गुणतालिकेत नेदरलँड्स सध्या नवव्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत नेदरलँड्सने आजचा सामना जिंकला तर ते चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्याचाही प्रबळ दावा सादर करेल. अशा स्थितीत आजचा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. इंग्लंडला आजचा सामना कोणत्याही किंमतीत जिंकायचा आहे. या विश्वचषकात आतापर्यंतचा हा सामना दोन सर्वात अयशस्वी संघांमधला असला तरी त्याचा अर्थ विशेष आहे. त्यामुळे हा सामना खूपच रोमांचक होऊ शकतो.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –

इंग्लंड: जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार/यष्टीरक्षक), मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, गस ऍटकिन्सन, आदिल रशीद.

नेदरलँड्स: वेस्ली बॅरेसी, मॅक्स ओ’डॉड, कॉलिन एकरमन, सिब्रांड एंजेलब्रेक्ट, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार/यष्टीरक्षक), बास डी लीडे, तेजा एनडामानुरु, लोगान व्हॅन बीक, रॉल्फ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eng vs ned match updates england team has won the toss and decided to bat against netherlands in world cup 2023 vbm