ENG vs NZ 2nd Test Updates: क्रिकेटच्या मैदानावर तुम्ही कितीत विचित्र पराक्रम घडताना पाहिले असतील माहीत नाही, पण न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान असे काही घडले, ज्याचे फार कमी चाहत्यांनी पाहिले असेल. न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना वेलिंग्टन येथे खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लिश संघाचा माजी कर्णधार जो रुटने कसोटी कारकिर्दीतील २९वे शतक झळकावले, जे खूप खास होते. वास्तविक, रूटच्या शतकादरम्यान न्यूझीलंडचा गोलंदाज नील वॅगनरचे शतकही पूर्ण झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पावसाने पहिल्या दिवसाचा खेळ थांबवण्यापूर्वी नील वॅग्नरने डावातील ६५ व्या षटकात टाकण्यासाठी आला होता. वॅग्नरने यापूर्वी १६ षटकांत ९५ धावा दिल्या होत्या, तर या षटकाच्या पहिल्या चेंडूपासून स्ट्राइकवर आलेला जो रुटही ९५ धावांवर फलंदाजी करत होता. पहिल्या चेंडूवर रुटने चौकार लगावला आणि दोन्ही खेळाडूंची धावसंख्या ९९ पर्यंत पोहोचली. रूटने या धावा केल्या, तर वॅगनरने या धावा दिल्या. जेव्हा रूटने ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर डीप मिड-विकेटकडे फटका लगावत दोन धावा चोरल्या तेव्हा फलंदाज आणि गोलंदाज दोघांनी १०० धावांचा टप्पा ओलांडला. क्रिकेटच्या इतिहासात असे फार क्वचितच घडले असेल.

रुटने १०१ धावांच्या या नाबाद खेळीत आतापर्यंत १८२ चेंडूंचा सामना केला आहे, ज्यामध्ये त्याने केवळ ७ चौकार लगावले आहेत. या काळात हॅरी ब्रूक रूटला पूर्ण साथ देत आहे. खेळ थांबेपर्यंत ब्रूक १६९ चेंडूत २४ चौकार आणि ५ गगनचुंबी षटकारांच्या मदतीने १८४ धावांवर नाबाद आहे. तिसऱ्या विकेटसाठी दोघांमध्ये २९४ धावांची भागीदारी झाली असून, या मैदानावर चौथ्या विकेटसाठी ही सर्वात मोठी भागीदारी आहे.

हेही वाचा – INDW vs AUSW: अंजुम चोप्राला मिठी मारताच हरमनप्रीतला आले रडू; या भावनिक क्षणाचा आयसीसीने शेअर केला VIDEO

मॅट हेन्री आणि टीम साऊदीच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे इंग्लिश संघाने अवघ्या २१ धावांत आपले आघाडीचे ३ फलंदाज गमावले तेव्हा या दोन फलंदाजांनी इंग्लंडचे बुडणारे जहाज हाताळले. मग या दोन खेळाडूंनी संघाला अडचणीतून तर सोडाच पण मोठ्या धावसंख्येचा मार्गही दाखवला. खेळ थांबेपर्यंत इंग्लंडने ६५ षटकानंतर ३ बाद ३१५ धावा केल्या आहेत. न्यूझीलंड संघाकडून मॅट हेन्रीने २ आणि टीम साऊथीने १ विकेट घेतली.