पाकिस्तान आणि इंग्लंड संघातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना आज रावळपिंडी येथे पार पडला. यासामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा ७४ धावांनी पराभव केला. त्याचबरोबर इंग्लंडने २२ वर्षानंतर पाकिस्तानमध्ये कसोटी सामना जिंकण्याचा कारनामा केला आहे. इंग्लंडने कसोटी सघांने तसेच बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली अजेय राहण्याची मालिका कायम ठेवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने पहिल्या डावात ६५७ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने पहिल्या डावात ५७९ धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडने सात गड्यांच्या मोबदल्यात २६४ धावा करून डाव घोषित केला. अशाप्रकारे इंग्लिश संघाला एकूण ३४२ धावांची आघाडी मिळाली आणि संघाने पाकिस्तानसमोर ३४३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ पाचव्या दिवशी २६८ धावांवर गारद झाला. त्यामुळे इंग्लंड संघानी ७४ धावांनी विजय मिळवला.

पहिल्या डावात इंग्लंडडून चार फलंदाजांनी शतके झळकावली. यामध्ये जॅक क्रोली (१२२), बेन डकेट (१०७), ऑली पोप (१०८) आणि हॅरी ब्रूक (१५३) यांचा समावेश आहे. प्रत्युत्तरात पाकिस्तानने पहिल्या डावात ५७९ धावा केल्या. अब्दुल्ला शफीकने ११४, इमाम-उल-हकने १२१ धावा आणि कर्णधार बाबर आझमने १३६ धावा केल्या. अशाप्रकारे दुसऱ्या डावात इंग्लंड ७८ धावांची आघाडी घेऊन मैदानात उतरला.

दुसऱ्या डावात पाकिस्तानचे फलंदाज अपयशी ठरले –

दुसऱ्या डावात इंग्लंडने सात गड्यांच्या मोबदल्यात २६४ धावा करून डाव घोषित केला. जो रूटने ७३ आणि हॅरी ब्रूकने ८७ धावा केल्या. त्याचवेळी जॅक क्रॉलीने ५० धावा केल्या. अशाप्रकारे इंग्लिश संघाला एकूण ३४२ धावांची आघाडी मिळाली आणि संघाने पाकिस्तानसमोर ३४३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ पाचव्या दिवशी २६८ धावांवर गारद झाला. पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात सौद शकीलने सर्वाधिक ७६ धावा केल्या. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात ओली रॉबिन्सन आणि जेम्स अँडरसन यांनी प्रत्येकी ४ विकेट घेतल्या.

इंग्लंडने पाकिस्तानमध्ये २२ वर्षांनंतर जिंकला कसोटी सामना –

इंग्लंडचा संघ १७ वर्षांनंतर इंग्लंडच्या दौऱ्यावर आला आहे. त्यांनी पहिल्याच कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव गेल्या १७ वर्षांत एकही संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला नव्हता. इंग्लंडला २२ वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये कसोटी जिंकण्यात यश आले आहे. इंग्लिश संघाने पाकिस्तानमध्ये शेवटचा कसोटी सामना २००० साली जिंकला होता. त्यानंतर तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने कराचीमध्ये पाकिस्तानचा सहा विकेट्स राखून पराभव करत, मालिका देखील १-० अशी जिंकली होती.

हेही वाचा – PAK vs ENG 1st Test: इंग्लंडला मोठा धक्का; लियाम लिव्हिंगस्टोन पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर, जाणून घ्या कारण

इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान कसोटी आकडेवारी –

इंग्लंडने पाकिस्तानमध्ये २५ कसोटी सामने खेळले असून, ३ जिंकले आहेत आणि ४ गमावले आहेत. त्याचबरोबर १८ कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत. दोन्ही देशांमध्ये एकूण ८७ कसोटी सामने खेळले गेले आहेत. यापैकी इंग्लंडने २७ तर पाकिस्तानने २१ कसोटी सामने जिंकले आहेत. तसेच ३९ कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत. बेन स्टोक्सचा कर्णधार म्हणून हा पहिलाच इंग्लंड दौरा असून त्याने पहिल्याच दौऱ्यात संघाला विजय मिळवून दिला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eng vs pak england beat pakistan by 74 runs after 22 years in a test match in pakistan vbm