England vs South Africa ICC Cricket World Cup 2023 Match Updates: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये आज इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका संघ आमनेसामने आहेत. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यादरम्यान इंग्लंडला मोठा धक्का बसला. संघाचा वेगवान गोलंदाज रीस टॉप्ली जखमी झाला असून त्याला मैदान सोडावे लागले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

डावाच्या सातव्या षटकात गोलंदाजी करताना रीस टॉप्ली जखमी झाला. रीस टॉप्लीने टाकलेला चेंडू व्हॅन डर ड्यूसेनने मिड मिड-ऑफच्या दिशेला मारला. हा चेंडूरीस टॉप्लीने पकडण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या हाताला लागला आणि मिड-ऑनच्या दिशेने गेला आणि तो खाली पडला. त्यामुळे टॉप्लीच्या बोटाला दुखापत झाली, त्यानंतर फिजिओ मैदानात पोहोचले आणि टॉप्लीच्या डाव्या हाताच्या बोटाला झालेली दुखापत पाहिली. दुखापतीमुळे टॉप्ली अस्वस्थ दिसत होता, त्यानंतर त्याला मैदान सोडावे लागले.

या षटकात रीस टॉप्ली केवळ पाच चेंडू टाकू शकला. त्यामुळे जो रूटने चेंडू टाकून त्याचे षटक पूर्ण केले. रीस टॉप्लीने पहिल्याच षटकात क्विंटन डी कॉकची विकेट घेत इंग्लंडला पहिले यश मिळवून दिले होते. रीस टॉप्ली बाहेर जाणे हा इंग्लंडसाठी मोठा धक्का आहे.

हेही वाचा – IND vs NZ, World Cup 2023: हरभजन सिंगने रोहित शर्माला दिला महत्त्वाचा सल्ला, सांगितले कोण असेल हार्दिकचा बदली खेळाडू?

पन्नास षटकांच्या विश्वचषकाच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इंग्लंडचा विक्रम ४-३ असा असला, तरी यावेळी दक्षिण आफ्रिकेची कामगिरी सरस ठरली आहे. इंग्लंडचा संघ प्रत्येक विभागात संघर्ष करत असून त्याचे मनोधैर्य खचले आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडचा न्यूझीलंडकडून पराभव झाला होता. यानंतर इंग्लंडने बांगलादेशचा पराभव केला, पण अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवाने त्यांचे मनोबल खालावले. त्यामुळे इंग्लंड संघाला एक युनिट म्हणून खेळावे लागेल.