Ollie Pope becomes first player to score 7 Test centuries against 7 different teams : इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने इंग्लंड संघाने जिंकले आहेत. त्याचबरोबर तिसऱ्या सामन्यातही इंग्लंड संघ जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. ऑली पोपच्या नेतृत्वाखाली खेळणारा इंग्लंडचा संघ तिसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत आहे. यादरम्यान ओली पोपने शानदार शतक झळकावले. या शतकासह त्याने एक मोठा विक्रमही केला आहे.

ऑली पोपचे हे कसोटी क्रिकेटमधील सातवे शतक आहे आणि ते कोणतेही सामान्य शतक नाही. या शतकासह त्याने इतिहासही घडवला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एक फलंदाज ७ शतके झळकावून इतिहास घडवू शकतो. अशा परिस्थितीत हे शतक ऐतिहासिक आणि अद्वितीय का आहे? ते जाणून घेऊया.

Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
Kevin Pietersen play in Duleep Trophy 2003-04
Duleep Trophy : एकेकाळी इंग्लंडचा केव्हिन पीटरसन दुलीप ट्रॉफीत ठरला होता सर्वाधिक धावा करणारा खेळाडू
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
renukaswamy offere to pavithra gowda live in relationship
Renukaswamy Case Chargesheet: ‘लिव्ह इनमध्ये ये, महिन्याला १० हजार देतो’, चाहत्याची अभिनेत्रीला ऑफर; हत्या होण्यापूर्वी पाठवले गुप्तांगाचे फोटो
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
russian spy whale death
नॉर्वेमध्ये मृतावस्थेत आढळलेल्या रशियन गुप्तहेर व्हेलची कहाणी; हेरगिरीसाठी कसा केला जातो प्राण्यांचा वापर?

ऑली पोपचे शतक अद्वितीय का आहे?

खरं तर, तो जगातील पहिला फलंदाज आहे ज्याने वेगवेगळ्या देशांविरुद्ध ७ शतके झळकावली आहेत. याआधी इतर कोणत्याही खेळाडूने अशी कामगिरी केलेली नाही. या सामन्यात त्याने अवघ्या १०२ चेंडूत शतक झळकावले आहे. त्याचे कसोटी क्रिकेटमधील कर्णधार म्हणूनही हे पहिलेच शतक आहे. ऑली पोपने २०२० मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिले शतक झळकावले. यानंतर त्याने न्यूझीलंड, पाकिस्तान, आयर्लंड, भारत, वेस्ट इंडिज आणि आता श्रीलंकेविरुद्ध शतके झळकावली.

हेही वाचा – Duleep Trophy 2024 : ऋतुराजच्या इंडिया सी संघाने मारली बाजी, श्रेयसच्या इंडिया डीचा ४ विकेट्सनी उडवला धुव्वा

ऑली पोपने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये झळकावलेली शतके :

१३५* विरुद्ध दक्षिण आफ्रिका (२०२०)
१४५ विरुद्ध न्यूझीलंड (२०२२)
१०८ विरुद्ध पाकिस्तान (२०२२)
२०५ विरुद्ध आयर्लंड (२०२३)
१९६ विरुद्ध भारत (२०२४)
१२१ विरुद्ध वेस्ट इंडीज (२०२४)
१५४विरुद्ध श्रीलंका (२०२४)

इंग्लंडच्या कर्णधाराचे दुसरे जलद शतक –

ऑली पोपने शनिवारी केवळ १०२ चेंडूंमध्ये १०० धावांचा टप्पा ओलांडला, ज्यामुळे तो कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडचा कर्णधार म्हणून दुसरे सर्वात जलद शतक झळकावले. ग्रॅहम गूच, ज्याने त्याच्या कारकीर्दीत ३४ कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडचे नेतृत्व केले होते, तो यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. या माजी उजव्या हाताच्या फलंदाजाने १९९० मध्ये लॉर्ड्सवर भारताविरुद्ध ९५ चेंडूत शतक पूर्ण केले होते.

हेही वाचा – Manav Suthar : दुलीप ट्रॉफीमध्ये ७ विकेट्स आणि ७ मेडन षटकं टाकणारा…कोण आहे मानव सुथार? जाणून घ्या

तिसऱ्या कसोटीतही इंग्लंडची आक्रम फलंदाजी –

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या संघाने आक्रमक फलंदाजी केली. इंग्लंड संघाने पहिल्या सर्वबाद ३२५ धावा केल्या. इंग्लंडकडून कर्णधार ऑली पोपने सर्वाधिक १५४ धावांचे योगदान दिले. त्याने आपल्या खेळीत १५६ चेंडूचा सामना करताना १९ चौकार आणि २ षटकार मारले. त्याचबरोबर बेन डकेटने ७९ चेंडूचा सामना करताना ९ चौकार आणि दोन षटकार मारले.