Josh Hull test debut for England in ENG vs SL 3rd Test Match : इंग्लंडचा जोश हल शुक्रवारपासून ओव्हलवर सुरू झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. हल याला मॅथ्यू पॉट्सच्या जागी संधी देण्यात आली आहे. हा इंग्लंड संघातील प्लेइंग इलेव्हनमधील एकमेव बदल आहे, ज्याने लॉर्ड्सवर १९० धावांनी विजय मिळवून मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली होती. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुडच्या मांडी दुखापती झाल्यामुळे बाहेर आहे. त्यामुळे वुडच्या अनुपस्थितीमुळे हलला इंग्लंड संघात येण्याचे दार उघडले.

इंग्लंडकडून कसोटी खेळणारा तिसरा सर्वात तरुण वेगवान गोलंदाज –

२० वर्षे आणि १७ दिवसांच्या वयात, जोश हल इंग्लंडकडून कसोटी खेळणारा तिसरा सर्वात तरुण वेगवान गोलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी बेन होल्योके आणि सॅम करन आहेत. या दोघांनी वयाच्या १९ व्या वर्षी कसोटी पदार्पण केले होते. दुखापतग्रस्त बेन स्टोक्सच्या अनुपस्थितीत या मालिकेत इंग्लंडचे कर्णधारपद भूषवत असलेल्या ऑली पोपने यजमान संघाच्या गोलंदाजीत जोश हल आपली वेगळी ओळख निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त केला. जोश हल ६ फूट ७ इंच उंच आहे. तसेच त्याची शूज साईज १५ आहे. त्याने १० फर्स्ट क्लास, ९ लिस्ट ए आणि २१ टी-२० सामने खेळले आहेत. त्याने फर्स्ट क्लासमध्ये १६, लिस्ट ए मध्ये १७आणि टी-२० मध्ये २४ विकेट्स घेतल्या आहेत.

Sculptor Jaydeep Apte Comment
Sculptor Jaydeep Apte: ‘घाणेरड्या राजकारणामुळे मी पोलिसांना शरण आलो’, शिल्पकार जयदीप आपटेचा दावा
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
renukaswamy offere to pavithra gowda live in relationship
Renukaswamy Case Chargesheet: ‘लिव्ह इनमध्ये ये, महिन्याला १० हजार देतो’, चाहत्याची अभिनेत्रीला ऑफर; हत्या होण्यापूर्वी पाठवले गुप्तांगाचे फोटो
Rahul Dravid appointed head coach of Rajasthan Royals
Rahul Dravid IPL 2025 : राहुल द्रविडचे आयपीएलमध्ये पुनरागमन, ‘या’ संघाला १६ वर्षानंतर ट्रॉफी जिकून देण्यासाठी सज्ज!
sunil tingre connection with Porsche car accident
कल्याणीनगर अपघात प्रकरणात आमदार टिंगरेंची चौकशी केल्याला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा दुजोरा

ऑली पोप जोश हलबद्दल काय म्हणाला?

जखमी बेन स्टोक्सच्या अनुपस्थितीत ऑली पोप संघाचे नेतृत्व करत आहे. सामन्याआधीच्या पत्रकार परिषदेत त्याने हलच्या क्षमतेबद्दल भाष्य केले. तो म्हणला, “मी सहसा नेटमध्ये गोलंदाजांचा सामना करत नाही, परंतु मी खूप उत्सुक होतो. कारण मी अद्याप त्यांचा सामना केलेला नाही, म्हणून मला तिथे जाऊन त्यांच्याकडे काय आहे ते पहायचे होते. त्याची क्षमता खूप जास्त आहे. तो ६ फूट ७ इंच उंच आहे आणि तो चेंडू चांगल्या वेगाने स्विंग करू शकतो.”

हेही वाचा – Praveen Kumar Wins Gold : प्रवीण कुमारने रेकॉर्डब्रेक उंच उडी मारत पटकावले सुवर्णपदक! भारताला मिळवून दिले २६ वे पदक

ऑली पोप पुढे म्हणाला, “तो अजूनही नवीन आहे, परंतु त्याच्याकडे चांगली कौशल्ये आहेत. या कसोटीत तो काय करू शकतो आणि पुढे जाऊ शकतो हे पाहण्यासाठी आम्ही सर्वजण उत्सुक आहोत. युवा खेळाडूंना या स्तरावर मिळणाऱ्या संधींचा लाभ घेताना पाहणे नेहमीच छान असते.” ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी इंग्लंडच्या मर्यादीत षटकाच्या चेंडूच्या संघातही हलची निवड करण्यात आली आहे.

हेही वाचा – Vitality Blast T20 : यष्टीरक्षकाच्या चुकीमुळे अंपायरने दिला नो बॉल! क्रिकेटचा ‘हा’ नियम तुम्हाला माहित आहे का? पाहा VIDEO

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाटी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन:

डॅन लॉरेन्स, बेन डकेट, ऑली पोप (कर्णधार), जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, ऑली स्टोन, जोश हल, शोएब बशीर.