Mark Wood out for remainder of year due to elbow injury : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेतून कर्णधार जोस बटलर बाहेर पडल्यानंतर आता इंग्लंड संघासाठी आणखी एक वाईट बातमी आली आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुड बराच काळ संघातून बाहेर झाला आहे. उजव्या कोपराच्या दुखापतीमुळे मार्क वुड जवळपास ४ महिने बाहेर आहे. म्हणजेच तो यंदा वर्षभर खेळू शकणार नाही. कसोटी मालिकेसाठी इंग्लंडला यावर्षी पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा दौरा करायचा आहे. अशा परिस्थितीत मार्क वुड या दौऱ्यांवर जाऊ शकणार नाही, हा त्याच्या संघासाठी मोठा धक्का आहे.

यापूर्वी इंग्लंड संघाचा कर्णधार जोस बटलरला दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेतून बाहेर पडावे लागले होते. ओल्ड ट्रॅफर्ड येथे श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत गोलंदाजी करताना उजव्या मांडीला ताण पडल्याने खबरदारी म्हणून वुडला मालिकेतून माघार घ्यावी आली. तथापि, नंतर त्याच्या कोपरच्या सांध्यामध्ये वेदना होत असल्याने त्याने नियमित कोपराचे स्कॅन केले आणि नंतर एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये माहिती दिली की, त्याला खूप वाईट बातमी मिळाली आहे.

Akash Deep has revealed How Virat Kohli gifted his bat that saved Gabba Test for India
Virat Kohli : ‘मी बॅट मागितली नव्हती, त्यानेच…’, गाबा कसोटी वाचवणाऱ्या आकाशदीपचा विराटच्या बॅटबद्दल मोठा खुलासा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
He should focus on his batting and not hairstyle Adam Gilchrist slams Shubman Gill his failures
Shubman Gill : ‘हेअरस्टाइलवर नव्हे तर फलंदाजीवर लक्ष दे…’, अ‍ॅडम गिलख्रिस्टने ‘या’ भारतीय फलंदाजाला फटकारले
Adam Gilchrist says Sir Don Bradman would have troubled ahead Jasprit Bumrah in batting
Jasprit Bumrah : ‘….बुमराह असता तर ब्रॅडमनची सरासरी ९९ नसती’, आस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचं मोठं विधान
Kagiso Rabada create history first SA20 2025 Bowler to bowl 2 consecutive maiden overs in the powerplay
SA20 2025 : कगिसो रबाडाने घडवला इतिहास! अश्विन-चहलला मागे टाकत ‘हा’ पराक्रम करणारा जगातील पहिला गोलंदाज
Rohit Sharma Practice With Mumbai Ranji Trophy Team at Wankhede Stadium
Rohit Sharma: रोहित शर्मा रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत, हिटमॅनने घेतला मोठा निर्णय; मुंबई संघासह…
Image of Indian Cricket Team
Ind vs Eng T20 Series : इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची निवड, तब्बल एक वर्षानंतर शमीचे पुनरागमन
NZ vs SL Sri Lanka beat New Zealand by 140 runs Mark Chapman 82 runs in 3rd ODI match at Eden Park
NZ vs SL : तिसऱ्या वनडेत श्रीलंकेने उडवला न्यूझीलंडचा धुव्वा, मार्क चॅपमनची खेळी ठरली व्यर्थ

मार्क वुड पुढच्या वर्षी पुनरागमन करणार –

वुडने इंस्टाग्रामवर लिहिले की त्याच्या कोपरच्या नियमित तपासणीदरम्यान, त्याच्या उजव्या कोपरच्या हाडात समस्या असल्याचे ऐकून त्याला धक्का बसला. परिणामी, तो इंग्लंडच्या वर्षातील शेवटच्या सहा कसोटी सामन्यांना मुकणार आहे, त्यापैकी तीन ऑक्टोबरमध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध डिसेंबरमध्ये होतील. वुड पुढील चार महिन्यांत ईसीबी वैद्यकीय पथक पुढील चार महिने मार्क वर्डच्या दुखापतीवर लक्ष ठेवून असेन. तसेच २०२५ च्या सुरूवातीस पूर्ण तंदुरुस्त होऊन संघाात परत येण्याचे त्याचे उद्दिष्ट आहे. जेणेकरुन तो इंग्लंडच्या मर्यादीत षटकांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यासाठी आणि पाकिस्तानमधील आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी वेळेत पोहोचू शकेल. चॅम्पियन्स ट्रॉफी फेब्रुवारी २०२५ मध्ये पाकिस्तानमध्ये खेळवली जाईल.

हेही वाचा – Josh Inglis : जोश इंगलिसने ४३ चेंडूत झळकावले शतक, फक्त षटकार-चौकारांसह केल्या ७० धावा, मोडला मॅक्सवेल-फिंचचा विक्रम

जगातील वेगवान गोलंदाजांमध्ये वुडची गणना –

इंग्लंडच्या मार्क वुडची गणना जगातील सर्वात वेगवान गोलंदाजांमध्ये केली जाते. या वर्षी जुलैमध्ये त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्रेंट ब्रिज कसोटीदरम्यान ९७.१ किमी प्रति तास वेगाने चेंडू टाकला होता. त्यानंतर त्याचा कर्णधार बेन स्टोक्सने भाकीत केले की तो त्याच्या कारकिर्दीच्या समाप्तीपूर्वी १०० किमी प्रति तासाचा वेग पार करेल. सध्या श्रीलंकेविरुद्ध सुरु असलेल्या मालिकेत मार्क वुडच्या अनुपस्थितीत, ऑली स्टोनला गेल्या आठवड्यात लॉर्ड्स कसोटीसाठी परत बोलावण्यात आले होते, जो तीन वर्षांपूर्वी पाठीच्या शस्त्रक्रियेनंतरचा पहिला कसोटी सामना होता. त्याच वेळी, २० वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज जोश हलने ओव्हलवर सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीत पदार्पण केले.

Story img Loader