England vs Sri Lanka, World Cup 2023: श्रीलंकेकडून आठ विकेट्सनी दारूण पराभव झाल्यानंतर इंग्लंड विश्वचषक २०२३मधून जवळपास बाहेर पडली आहे.गतविजेत्या इंग्लिश संघासाठी विश्वचषक २०२३ खूपच वाईट ठरला आहे. इंग्लंड संघाने आतापर्यंत ३ सामने खेळले होते, त्यातील दुसरा सामना सोडला, तर इंग्लंडने उर्वरित ३ सामन्यात पराभव पत्करला आहे. अशात त्यांना श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातही गुरुवारी (दि. २६ऑक्टोबर) बंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. या सामन्यात त्यांच्या फलंदाजांनी अतिशय संघाला लाजवेल अशी फलंदाजी केली. संघाचा डाव अवघ्या १५६ धावांवर आटोपला. प्रत्युतरात लंकेने आठ गड्यांच्या मोबदल्यात हे लक्ष्य पार केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या विश्वचषकातील पाच सामन्यांमधला इंग्लंडचा हा चौथा पराभव आहे. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत १५६ धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेने दोन गडी गमावून २५.४ षटकात १६० धावा केल्या आणि सामना आठ गडी राखून जिंकला. २००७ पासून इंग्लंडने श्रीलंकेला विश्वचषकात पराभूत केलेले नाही. श्रीलंकेच्या लाहिरू कुमाराला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. त्याने एकूण तीन विकेट्स घेतला. कुसल मेंडिस आणि परेरा हे लवकर बाद झाले. त्यांनी अनुक्रमे ४ आणि ११ धावा केल्या. पाथुम निसांकाने ५४ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने पुन्हा एकदा उत्कृष्ट खेळी केली आहे. त्याच्या या शानदार खेळीमुळे श्रीलंकेने दमदार विजय नोंदवला.

इंग्लंडने श्रीलंकेसमोर केवळ १५६ धावांचे लक्ष्य ठेवले होते

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ १५६ धावांवर गारद झाला. २०१९ मध्ये विश्वविजेता बनलेल्या संघासाठी हा विश्वचषक खूपच वाईट ठरला आहे. या सामन्यातही हा संघ केवळ ३३.२ षटकेच खेळू शकला. बेन स्टोक्सने सर्वाधिक ४३ धावा केल्या. त्याच्याशिवाय जॉनी बेअरस्टोने ३० आणि डेव्हिड मलानने २८ धावा केल्या. श्रीलंकेकडून लाहिरू कुमाराने तीन विकेट्स घेतल्या. अँजेलो मॅथ्यूज आणि कसून रजिताने प्रत्येकी दोन गडी बाद केले. तिक्षणाने एक विकेट घेतली.

दोन्ही संघांचे प्लेइंग-११

श्रीलंका: पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक/कर्णधार), सदिरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजय डी सिल्वा, अँजेलो मॅथ्यूज, महेश तिक्षणा, कसून राजिथा, लाहिरू कुमारा, दिलशान मदुशंका.

इंग्लंड: जॉनी बेअरस्टो, डेविड मालन, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (यष्टीरक्षक), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, आदिल रशीद, मार्क वुड.