Why West Indies Did Not Give Guard of Honour to James Anderson: विक्रमी १८८ कसोटी खेळणारा इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध आपला अखेरचा कसोटी सामना खेळत आहे. अँडरसनने २००३ मध्ये पदार्पण केले आणि आता तो त्याच्या २२ वर्षांच्या कारकिर्दीला अलविदा म्हणत आहे. वेस्ट इंडिजकडून अँडरसनला गार्ड ऑफ ऑनर देण्यात येणार होता पण एका कारणामुळे ते अँडरसनला त्यांच्या शैलीत अलविदा करू शकले नाहीत, आता याचे कारण समोर आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – James Anderson: कोणासमोर गोलंदाजी करणं अवघड? ‘या’ दिग्गज भारतीय खेळाडूचं नाव घेत अँडरसन म्हणाला…

इंग्लंडचा संघ वेस्ट इंडिजविरूद्धच्या पहिल्या कसोटीत पुढे आहे, इंग्लिश संघाला विजयासाठी ४ विकेट्सची आवश्यकता आहे. वेस्ट इंडिजने पहिल्या डावात १२१ धावा केल्या होत्या. तर जेम्स अँडरसनने एक विकेट घेतली. यानंतर तो इंग्लंडच्या डावात शेवटची फलंदाजी करायला उतरला होता. सहसा, जेव्हा एखादा खेळाडू फलंदाजीला येतो तेव्हा त्याला गार्ड ऑफ ऑनर दिला जातो. मात्र, वेस्ट इंडिजने अँडरसनला गार्ड ऑफ ऑनर दिला नाही.

हेही वाचा – Ben Stokesने कसोटी क्रिकेटमध्ये रचला इतिहास, इंग्लंडसाठी ही कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू

पत्रकार परिषदेत बोलताना वेस्ट इंडिज संघाचा गोलंदाज जेडन सील्स म्हणाला, ‘आम्ही अँडरसन मैदानात येण्यापूर्वी त्याला गार्ड ऑफ ऑनर देऊ असं ठरवलं होतं. मात्र, रनआउट झाल्यामुळे आम्ही दुसऱ्या बाजूला गेलो आणि अँडरसनला गार्ड ऑफ ऑनर देऊ शकलो नाही. जेसन तिथे त्याच्याबरोबर होता ही एक चांगली गोष्ट होती. अँडरसन मैदानावर येत असताना जेसन होल्डर मैदानावर तो येत होता तिथे उपस्थित होता आणि त्याने हात मिळवत त्याला शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा – BCCIचा गौतम गंभीरला धक्का, प्रशिक्षक म्हणून निवडलेल्या कोचिंग स्टाफला बोर्डाने दिला नकार

फलंदाजीसाठी मैदानात आल्यानंतर अँडरसनला एकाही चेंडूचा सामना न करता पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले, कारण जेमी स्मिथ डीपमध्ये झेलबाद झाला आणि तो बाद होणारा शेवटचा खेळाडू ठरला. सामन्यानंतर स्मिथ म्हणाला, “मी अजून एक षटकार लगावून अँडरसनला अखेरची फलंदाजी देऊ शकलो नाही, ही एक निराशाजनक गोष्ट आहे आणि हीच खंत माझ्या या खेळीबद्दल मला वाटतं राहिल.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eng vs wi why west indies did not gave guard of honour to james anderson as he playing his last test bdg