भारतीय फलंदाजांपाठोपाठ गोलंदाजांनीही इंग्लंड विरूध्दच्या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये आपली कामगिरी चोख बजावत इंग्लंडचा पहिला डाव १९१ धावांमध्ये संपुष्टात आणला. प्रग्नान ओझाने ५ गडी तर आर. अश्‍विनने 3 गडी बाद करून आज (शनिवार) तिस-या दिवशी सामन्यावर आपली पकड घट्ट केली. भारत सध्या ३३० धावांनी आघाडीवर असून इंग्लंडला फॉलोऑन दिला आहे.  
अहमदाबादच्या मोटेरा येथील सरदार पटेल स्टेडियममध्ये भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामना सुरू आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पहिल्या दिवशी विरेंद्र सेहवागचे शतक आणि काल (शुक्रवार) चेतेश्‍वर पुजाराने दमदार द्विशतकाच्या जोरावर भारताने इंग्लंडसमोर ५२१ धावांचे आव्हान उभे केले होते.

Story img Loader