IND vs ENG England Announces Playing XI for 1st ODI: भारत वि इंग्लंड तीन सामन्यांची वनडे मालिका ६ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सराव म्हणून ही वनडे मालिका दोन्ही संघांसाठी उपयुक्त ठरणार आहे. पहिला सामना नागपूरमध्ये खेळवला जाणार असून या सामन्यासाठी इंग्लंडच्या संघाने एक दिवस आधीच आपली प्लेईंग इलेव्हन जाहीर केली आहे. इंग्लंडने ४५२ दिवसांनंतर विस्फोटक फलंदाजाला वनडे संघात संधी दिली आणि यासह तो प्लेईंग इलेव्हनचा भाग असून भारतीय संघाकडून खेळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये २०२४ मध्ये तुफान फॉर्मात असलेल्या जो रूटला स्थान मिळाले आहे, जो ४५२ दिवसांनंतर एकदिवसीय सामना खेळताना दिसणार आहे. जो रूटने शेवटचा एकदिवसीय सामना भारतात झालेल्या विश्वचषकात खेळला होता.

इंग्लंडच्या वनडे आणि टी-२० संघामध्ये फारसा फरक नाही. सलामीवीर म्हणून बेन डकेट आणि फिल सॉल्टची जोडीच मैदानात दिसणार आहे. हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टन यांचीही संघात निवड झाली आहे. जो रूट फक्त तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसणार आहे. या व्यतिरिक्त जेकब बेथल हा देखील संघाचा भाग आहे. ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, साकिब महमूद हे वेगवान गोलंदाज संघाचा भाग आहेत. आदिल रशीद हा फिरकीपटू म्हणून संघात आहे.

टी-२० मालिका गमावल्यानंतर आता एकदिवसीय मालिकाही इंग्लंडसाठी सोपी नसणार आहे. या फॉरमॅटमध्ये इंग्लंडच्या संघाने ४१ वर्षांपासून भारतात एकही वनडे मालिका जिंकलेली नाही. इंग्लंडने भारतात शेवटची वनडे मालिका १९८४ मध्ये जिंकली होती. शेवटची मालिका २०२१ मध्ये झाली होती, जी भारतीय संघाने २-१ ने जिंकली होती.

भारताविरूद्ध पहिल्या वनडेसाठी इंग्लंडची प्लेईंग इलेव्हन

बेन डकेट, फिल सॉल्ट, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर, लियाम लिव्हिंगस्टन, जॅकब बेथल, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि साकिब महमूद.

भारत वि इंग्लंड वनडे मालिकेसाठी दोन्ही संघ

भारत
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, श्रेयस अय्यर, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, ऋषभ पंत, केएल राहुल, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती.

इंग्लंड
जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, बेन डकेट, जो रूट, फिलिप सॉल्ट, जेमी स्मिथ, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, साकिब महमूद, आदिल रशीद, मार्क वुड.