Team India gain in WTC Points Table 2023-25: असे म्हणतात की जेव्हा कोणाचे नुकसान होते, तेव्हा कोणाला तरी तरी फायदा होतो. असाच काहीसा प्रकार टीम इंडियाच्या बाबतीत घडला आहे. खरं तर, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ॲशेस मालिका २-२ अशी बरोबरीत संपल्यानंतर आयसीसीने दोन्ही संघांना स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावला. यासोबतच दोन्ही संघांचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) गुणही कमी झाले आहेत. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्ध जिंकलेल्या अवघ्या एका कसोटी सामन्याच्या जोरावर भारतीय संघाला मोठा फायदा झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑस्ट्रेलियाला मागे टाकत टीम इंडियाने पटकावले दुसरे स्थान –

टीम इंडिया १६ गुणांसह डब्ल्यूटीसी गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. ऑस्ट्रेलिया २ सामने जिंकून तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे, तर इंग्लंडचा संघ २ सामने जिंकून पाचव्या स्थानावर घसरला आहे. ऑस्ट्रेलियाचे १८ आणि इंग्लंडचे ९ गुण आहेत. भारतापेक्षा जास्त गुण असूनही स्लो ओव्हर रेटमुळे ऑस्ट्रेलियाला फटका बसला आहे. ऑस्ट्रेलियाला -१० गुण आणि इंग्लंडला -१९ गुणांचा दंड आयसीसीकडून ठोठावण्यात आला आहे.

पाकिस्तानने पटकावले अव्वल स्थान –

आता पॉइंट टेबलमधील टॉप ५ टीम्स पाहता पाकिस्तान १०० टक्के आणि एकूण २४ पॉइंट्ससह टॉपवर आहे. पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्धचे दोन्ही कसोटी सामने जिंकले. भारत ६६.६७ टक्के आणि एकूण १६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. पावसामुळे भारताचा एक सामना अनिर्णित राहिला होता. ऑस्ट्रेलियाने विजयाच्या ३० टक्केवारीने आणि एकूण १८ गुणांसह तिसरे स्थान पटकावले आहे. ऑस्ट्रेलियाला २ सामन्यात विजय आणि २ मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. त्याचबरोबर एक सामना अनिर्णित राहिला. स्लो ओव्हर रेटमुळे ऑस्ट्रेलियाला हे नुकसान सहन करावे लागले.

हेही वाचा – ENG vs AUS: आयसीसीची इंग्लंड-ऑस्ट्रेलियावर मोठी कारवाई! ‘ही’ चूक पडली महागात, डब्ल्यूटीसीमध्ये झाले नुकसान

वेस्ट इंडिज चौथ्या क्रमांकावर विराजमान –

वेस्ट इंडिज चौथ्या स्थानावर आहे. ज्याचे १६.६७ टक्के गुण आणि एकूण ४ गुण आहेत. वेस्ट इंडिजला एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आणि एक सामना अनिर्णित राहिला. इंग्लंड १५ टक्के गुणांसह एकूण ९ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. इंग्लंडने दोन सामने जिंकले आणि दोन गमावले. एक सामना अनिर्णित राहिला. दोन्ही सामने गमावल्यानंतर श्रीलंका सहाव्या स्थानावर आहे. बांगलादेश, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांनी आतापर्यंत एकही कसोटी मालिका खेळलेली नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: England australia lost due to slow over rate team india gain in wtc points table vbm