England beat Australia by 3 wickets in the third Test: हेडिंग्ले स्टेडियमवर खेळला गेलेल्या ॲशेस मालिकेतील तिसरा कसोटी सामना अतिशय रोमांचक झाला. मात्र, अखेर या सामन्यात यजमान इंग्लड संघाने ऑस्ट्रेलियावर ३ विकेट्सने विजय मिळवत बाजी मारली. सामन्यात इंग्लंला ऑस्ट्रेलियाने संघाने २५१ धावांचे लक्ष्य दिले होते, जे इंग्लडने हॅरी ब्रूकच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर पूर्ण केले. त्याचबरोबर इंग्लंड संघ अजूनही पाच सामन्यांच्या मालिकेत १-२ अशा फरकाने पिछाडीवर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हॅरी ब्रुकच्या खेळीमुळे इंग्लंडने मिळवला विजय –

युवा स्टार हॅरी ब्रूकच्या खेळीमुळे इंग्लंडने हेडिंग्ले कसोटी तीन विकेट्सने जिंकली. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात २६३ धावांवर गारद झाला होता. यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात २३७ धावा केल्या. अशा प्रकारे कांगारू संघाला २६ धावांची आघाडी मिळाली. त्यांनी दुसऱ्या डावात २२४ धावा केल्या आणि इंग्लंडला विजयासाठी २५१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. तिसऱ्या दिवस अखेर बिनबाद २७ धावा केल्या होत्या. त्यानंतर सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडने सात विकेट्स गमावत २५४ धावा करत सामना जिंकला.

हॅरी ब्रूकने ७५ धावांची शानदार खेळी साकारली –

इंग्लंडसाठी दुसऱ्या डावात युवा स्टार हॅरी ब्रुकने ९३ चेंडूचा सामना करताना ९ चौकारांच्या मदतीने ७५ धावांची शानदार खेळी केली. ब्रूकशिवाय सलामीवीर जॅक क्रॉलीने ४४ धावांचे योगदान दिले. बेन डकेट २३, जो रूट २१ आणि कर्णधार बेन स्टोक्स १३ धावा करून बाद झाले. मोईन अली आणि जॉनी बेअरस्टो यांना प्रत्येकी पाच धावाच करता आल्या. ख्रिस वोक्सने नाबाद ३२ आणि मार्क वुडने नाबाद १६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने पाच विकेट घेतल्या. मिचेल मार्श आणि पॅट कमिन्स यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

हेही वाचा – Cricket Australia: स्टीव्ह स्मिथने खुलासा केल्यानंतर ॲलिस्टर कुकने मागितली ॲलेक्स कॅरीची माफी, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

हॅरी ब्रूक आणि ख्रिस वोक्सने सावरला इंग्लंडचा डाव –

एकवेळ दुसऱ्या डावात १७१ धावांवर सहा गडी गमावून इंग्लंडचा संघ संघर्ष करत होता. येथून हॅरी ब्रूक आणि ख्रिस वोक्स यांनी आघाडी घेतली. दोघांनी सातव्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी केली. ब्रूक बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाला पुनरागमन करता येईल असे वाटत होते, पण वोक्सला मार्क वुडने चांगली साथ दिली. दोघांनी मिळून आठव्या विकेटसाठी २४ धावांची भागीदारी केली आणि संघाला विजय मिळवून दिला.