ब्रिस्टल : फलंदाजांच्या अपयशानंतर भारतीय महिला संघाच्या गोलंदाजांनी इंग्लंडंवर दडपण आणण्याचे प्रयत्न केले. परंतु धडाकेबाज फलंदाज अ‍ॅलिस कॅप्सेने तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात इंग्लंडला सात गडी राखून विजय मिळवून दिला. त्यामुळे तीन सामन्यांची मालिका भारताने १-२ अशी गमावली.

भारताने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १२२ धावा उभारल्या. रिचा घोषने २२ चेंडूंत ३३ धावा केल्या, तर अष्टपैलू पूजा वस्त्रकारने ११ चेंडूंत नाबाद १९ धावा काढल्या. इंग्लंडच्या गोलंदाजीपुढे भारताच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करली. सोफी इक्लेस्टोन (३/२५), सेरा ग्लेन (२/११) यांनी अप्रतिम गोलंदाजी केली.

त्यानंतर, इंग्लंडने १८.२ षटकांत भारताचे आव्हान पेलले. यात सलामीवीर सोफी डंकलेने ४४ चेंडूंत ४९ धावा काढल्या, तर १८ वर्षीय कॅस्पेने नाबाद ३८ धावांची खेळी साकारली.

संक्षिप्त धावफलक

भारत : २० षटकांत ८ बाद १२२

(रिचा घोष नाबाद ३३, दीप्ती शर्मा २४; सोफी इक्लेस्टोन ३/२५) पराभूत वि. इंग्लंड : १८.२ षटकांत ३ बाद १२६ (सोफी डंकले ४९, अ‍ॅलिस कॅप्से नाबाद ३८; राधा यादव १/१४)

Story img Loader