PAK vs ENG 1st Test Updates: इंग्लंडने पहिल्याच मुलतान कसोटीत पाकिस्तानचा ४७ धावा आणि एका डावाने लाजिरवाणा पराभव केला आहे. पाकिस्तानने पहिल्या डावात ५५६ धावा करूनही संघावर पराभवाची नामुष्की ओढवली आहे. इंग्लंडच्या संघाने मुलतानमधील खेळपट्टीवर विक्रमी ८२३ धावा करत पाकिस्तानच्या संघाला बॅकफूटवर टाकले. इंग्लंडकडून जो रूटने २६५ धावा तर हॅरी ब्रुकने ३१७ धावा करत त्रिशतक झळकावले आहे. पाकिस्तानला पुन्हा एकदा घरच्या मैदानावर मोठा लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा हा सलग सहावा पराभव आहे. गेल्या ९ कसोटी सामन्यांमधील पाकिस्तानचा हा सातवा पराभव आहे. गोलंदाजांसाठी उपयुक्त नसलेल्या खेळपट्टीवर इंग्लंडने सामना आपल्या बाजूनो वळवला. नाणेफेक गमावल्यानंतर आणि दीड दिवसांहून अधिक काळ क्षेत्ररक्षण केल्यानंतर हॅरी ब्रुकचे त्रिशतक आणि जो रूटच्या कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या (२६२ धावा) यांच्या जोरावर इंग्लंडने ८२३ धावा करून अनेक विक्रम मोडले.

Arundhati Reddy has been given 1 demerit point by ICC
Arundhati Reddy : टीम इंडियाला मोठा धक्का! आयसीसीने ‘या’ स्टार खेळाडूवर केली मोठी कारवाई
10th October Rashi Bhavishya In Martahi
१० ऑक्टोबर पंचांग: गुरुची वक्री चाल तर महागौरी…
India Women vs New Zealand Women match highlights in marathi
IND W vs NZ W : टीम इंडियाचा सलामीच्या सामन्यात दारुण पराभव, न्यूझीलंडच्या गोलंदाजांपुढे भारताची उडाली भंबेरी
Pakistan test captain Shan Masood on Virat Kohli
VIDEO : ‘विराटपेक्षा ‘या’ २४ वर्षीय खेळाडूचा रेकॉर्ड चांगला…’, पाकिस्तानच्या कसोटी कर्णधाराचे वक्तव्य
IND vs BAN 2nd Test Highlights in marathi
IND vs BAN : भारताचा बांगलादेशवर ‘बॅझबॉल’ शैलीत मालिका विजय, ऐतिहासिक विजयासह घरच्या मैदानावर केला विक्रम
SA vs IRE 2nd T20 Highlights in Marathi
SA vs IRE 2nd T20 : आयर्लंडचा ऐतिहासिक विजय! प्रथमच बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा १० धावांनी उडवला धुव्वा
Cameron Green Doubtful For Border-Gavaskar Trophy After Sustaining Back Injury In England ODIs
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, ‘या’ स्टार अष्टपैलू खेळाडूला झाली दुखापत
India beat Bangladesh by 280 Runs in 1st Test Ravichandran Ashwin fifer Rishabh Pant Shubman Gill Centuries
IND vs BAN: भारताचा बांगलादेशवर ऐतिहासिक विजय, गेल्या ९२ वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडली अशी गोष्ट

हेही वाचा – Rohit Sharma: कॅप्टन असावा तर असा… रोहित शर्माने अपघातग्रस्त मुशीर खानसाठी केलं असं काही की चाहत्यांकडून होतोय कौतुकाचा वर्षाव

पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, १४७ वर्षांच्या कसोटी इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं काही

पाकिस्तानसाठी हा त्यांच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात लाजिरवाणा पराभव आहे. या पराभवासह पाकिस्तान क्रिकेटच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रमही जमा झाला आहे. १४७ वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात इतर कोणत्याही संघाला अशाप्रकारे पराभवाचा सामना करावा लागला नाही. या सामन्याच्या पहिल्या डावात पाकिस्तान संघाने ५५६ धावा केल्या होत्या. यानंतर पाकिस्तानची दुसऱ्या डावाची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. पण आगा सलमान आणि आमेर जमाल यांच्या भागादारीने पाकिस्तानला सामन्यात कायम ठेवले. पण अखेरच्या दिवशी दोघेही फार काळ मैदानावर टिकू शकले नाहीत आणि पाकिस्तानचा संघ सर्वबाद झाला. कसोटी क्रिकेटच्या १४७ वर्षांच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे की पहिल्या डावात ५०० हून अधिक धावा करूनही एखाद्या संघाने कसोटी सामना गमावला आहे.

हेही वाचा – Rohit Sharma: रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या काही कसोटींना मुकणार? काय आहे कारण

पाकिस्तानने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना १४९ षटके फलंदाजी केली. यादरम्यान अब्दुल्ला शफीकने १८४ चेंडूत १०२ धावा, कर्णधार शान मसूदने १७७ चेंडूत १५१ धावा आणि अगा सलमानने ११९ चेंडूत नाबाद १०४ धावा केल्या. तर सौद शकीलनेही १७७ चेंडूत ८२ धावा केल्या.

हेही वाचा – Harry Brook Triple Century: मुलतान का नया सुलतान! हॅरी ब्रुकने झळकावले कसोटीतील दुसरे सर्वात वेगवान त्रिशतक, वीरेंद्र सेहवागचा महाविक्रमही मोडला

५५६ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने १५० षटकांत ८२३ धावा करत पहिला डाव घोषित केला. अशाप्रकारे इंग्लंडने पहिल्या डावात २६७ धावांची आघाडी घेतली. पण या सपाट खेळपट्टीवर पाकिस्तानचा दुसरा डाव केवळ २२० धावांवर आटोपला, त्यामुळे त्यांना डावाने पराभवाला सामोरे जावे लागले. खेळाच्या शेवटच्या दिवशी पाकिस्तानने १५२ धावांच्या पुढे खेळायला सुरुवात केली आणि त्यांच्या हातात ४ विकेट शिल्लक होत्या. पण पाकिस्तान संघ पाचव्या दिवशी मैदानावर एक सत्रही टिकू शकला नाही. पाकिस्तानचा अकरावा खेळाडू अबरार अहमद आजारी असल्याने तो फलंदाजीसाठी मैदानावर येऊ शकला नाही.

एखाद्या संघाने पहिल्या डावात ५०० पेक्षा जास्त धावा केल्या तर त्याच्या गोलंदाजांचे मनोबलही उंचावले होते. नसीम शाहनेही कर्णधार ऑली पोपला शून्यावर बाद करून संघाला पहिले यश मिळवून दिले, पण यानंतर पाकिस्तानी संघाला आनंद साजरा करण्याची मोठी संधी मिळाली नाही. यानंतर जॅक क्राऊलीने ७८ आणि बेन डकेट ८४ धावां करत बाद झाले. मात्र, जो रूट आणि हॅरी ब्रूक यांनी अनुक्रमे २६२ आणि ३१७ धावा करत धावांची जणू टांकसाळ उघडली. इंग्लंडने ७ गडी गमावून ८२३ धावा करून डाव घोषित केला. यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.