England vs Australia Ashes series 2023: वर्षातील सर्वात हाय व्होल्टेज अॅशेस मालिका सुरू झाली आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बर्मिंगहॅम येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी यजमानांनी डाव घोषित करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. कसोटी क्रिकेटमध्ये हे क्वचितच पाहायला मिळते, तर अॅशेसमध्ये हे दृश्य ९४ वर्षांनंतर पाहायला मिळाले. या सामन्यात ८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अॅशेसमध्ये शतक झळकावणारा इंग्लंडचा फलंदाज जो रूटसाठी पहिला दिवस खूप खास होता.

इंग्लंडने पहिल्या दिवशीच घोषित केला डाव –

इंग्लंडने पहिल्या दिवशी ७८ षटकांनंतर आपला डाव घोषित केला. त्यावेळी जो रूट ११८ आणि ऑली रॉबिसन १७ धावांवर खेळत होते. इंग्लंडच्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्य वाटले. १९३७ नंतर पहिल्यांदाच एखाद्या संघाने अॅशेसच्या पहिल्या दिवशी डाव घोषित केला आहे. १९३७ साली मेलबर्न येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने ६६ षटके खेळून डाव घोषित केला होता. त्यावेळी एका षटकात ८ चेंडू असायचे.

KL Rahul returns to nets after injury scare ahead BGT
KL Rahul : टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! पर्थ कसोटी सामन्यापूर्वी ‘हा’ स्टार खेळाडू दुखापतीतून सावरला
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
West Indies Beat England with New Record of Highest Successful Chase in in T20I At Home Soil of 219 Runs WI vs ENG
ENG vs WI: वेस्ट इंडिजचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय! संथ सुरूवातीनंतर षटकारांचा पाऊस, कॅरेबियन संघाने मोडला ७ वर्षे जुना विक्रम
Team India Performance in Border Gavaskar Trophy played at Australia
Team India : टीम इंडियाची ऑस्ट्रेलियामध्ये कामगिरी खूपच निराशाजनक, तब्बल ‘इतक्या’ वेळा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत पत्करावा लागलाय पराभव
Mumbai Indians will buy five of their old players for IPL 2025
Mumbai Indians : मुंबई इंडियन्स विक्रमी सहाव्यांदा जेतेपद पटकावण्यासाठी ‘या’ पाच जुन्या शिलेदारांवर लावणार बोली, जाणून घ्या कोण आहेत?
Jos Buttler hit 115 meter longest six out of stadium
Jos Buttler : जोस बटलरने मारला वर्षातील सर्वात लांब षटकार, चेंडू स्टेडियमच्या बाहेर गेल्याने गोलंदाजासह चाहतेही अवाक्, VIDEO व्हायरल
AUS vs PAK Pakistan won the ODI series in Australia after 22 years
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनी नोंदवला ऐतिहासिक विजय, भारताला मागे टाकत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला आशियाई संघ
AUS vs PAK Pakistan beat Australia by 8 wickets in the third ODI match
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात फडकावला झेंडा, वर्ल्ड चॅम्पियन संघाला घरच्या मैदानावर पाजलं पाणी

इंग्लंडच्या या निर्णयावर क्रिकेट चाहते दोन भागात विभागले आहेत. एकीकडे काही चाहत्यांनी या निर्णयाला नव्या क्रिकेटचा उदय म्हटले आहे, तर दुसरीकडे काहींनी हा मूर्खपणाचा निर्णय असल्याचे म्हटले आहे. तसे, जर आपण सर्वात कमी धावसंख्येवर डाव घोषित करण्याबद्दल बोलायचे, तर हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या नावावर आहे ज्याने २४ नोव्हेंबर २०१६ रोजी अॅडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध २५९/९ धावांवर डाव घोषित केला होता.

जो रूटने झळकावले शतक –

इंग्लंडने पहिल्या डावात जो रूटच्या शतकासह ३९३ धावा केल्या. या ३२ वर्षीय खेळाडूने नाबाद ११८ (१५१) धावा केल्या. २०१५ नंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध जो रूटचे हे पहिले शतक आहे. रुटने ३० व्या शतकासह मोठा विक्रमही केला. त्याने आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या शिव नारायण चंद्रपॉलची बरोबरी केली आहे.

हेही वाचा – Shahid Afridi on PCB: “अहमदाबादची खेळपट्टी आग ओकते की झपाटलेली…”; पाकिस्तानच्या माजी खेळाडूची पीसीबीवर सडकून टीका

चाहत्यांना बसला धक्का –

इंग्लंडचा हा निर्णय चाहत्यांना पचवता आला नाही. या निर्णयाला त्यांनी सोशल मीडियावर मूर्खपणा असल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी एका यूजरने याला बेसबॉलची भीती म्हटले आहे. काही जण म्हणाले की इंग्लंडला मूर्खपणा आणि शौर्य यातला फरक समजत नाही.