PAK vs ENG Test England Made Many Records: हॅरी ब्रूकच्या त्रिशतकाच्या बळावर इंग्लंडने पाकिस्तानविरुद्धच्या मुलतान कसोटीच्या चौथ्या दिवशी अनेक विक्रम केले. पाकिस्तान विरुद्धच्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडने आपला पहिला डाव ७ बाद ८२३ धावांवर घोषित केला. यासह इंग्लंड कसोटी क्रिकेटमध्ये तीन वेळा ८०० किंवा त्याहून अधिक धावा करणारा पहिला संघ ठरला आहे.

पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यातील गोलंदाजांच्या खराब कामिगिरी सर्वत्र टीका होत आहे. मुलतान क्रिकेट स्टेडियमच्या सपाट खेळपट्टीवर पहिल्या दिवसापासून मोठे विक्रम रचले जात आहेत. पाकिस्तानच्या तीन फलंदाजांनी शतके झळकावली आहेत, तर इंग्लंडच्या दोन फलंदाजांनी द्विशतके झळकावली. या सामन्यादरम्यान इंग्लंडने भारताचा २० वर्ष जुना विक्रम मोडीत काढला आहे.

PAK vs SA Corbin Bosch takes wicket on first ball of Test career to create new record
PAK vs SA: पदार्पणाच्या कसोटीत आफ्रिकेच्या खेळाडूने पहिल्याच चेंडूवर केला मोठा विक्रम, १३५ वर्षांत पहिल्यांदाच घडलं असं काही
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Vijay Hazare Trophy Mumbai Beat Arunachal Pradesh by 9 Wickets Under Shardul Thakur Captaincy
Vijay Hazare Trophy: शार्दूल ठाकूरच्या नेतृत्वात मुंबईने उडवला अरुणाचलचा धुव्वा; अवघ्या ३३ चेंडूत जिंकला सामना
Rohit Sharma To Open in MCG Test Confirms India Assistant Coach Abhishek Nayar IND vs AUS
IND vs AUS: रोहित शर्मा मेलबर्न कसोटीत कितव्या क्रमांकावर फलंदाजी करणार? अखेर गूढ उकललं; कोचने दिले मोठे अपडेट
Jasprit Bumrah Bowled Out Travis Head on Duck and Breaks Anil Kumble Record of Most Wickets At MCG IND vs AUS
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचा तारणहार हेड असा झाला त्रिफळाचीत; जसप्रीत बुमराहने नावावर केला अनोखा विक्रम, पाहा VIDEO
Sam Konstas hit six against Jasprit Bumrah after 4483 balls in IND vs AUS Boxing Day Test at Melbourne match
IND vs AUS : सॅम कॉन्स्टासने जसप्रीत बुमराहविरुद्ध षटकार लगावत लावली विक्रमांची रांग! पाहा संपूर्ण यादी
IND vs AUS Boxing Day Test Sam Konstas hit six against Jasprit Bumrah after 4483 balls
IND vs AUS : १९ वर्षीय खेळाडूने जसप्रीत बुमराहविरुद्ध केला मोठा पराक्रम, ११४५ दिवसांनी मोडला खास विक्रम
IND vs AUS Boxing Day Test Virat Kohli and Sam Konstas argument video viral
IND vs AUS : विराट आणि सॅम कॉन्स्टास यांच्यात झाली धक्काबुक्की! पंचांसह ख्वाजाला करावी लागली मध्यस्थी, पाहा VIDEO

हेही वाचा – Harry Brook Triple Century: मुलतान का नया सुलतान! हॅरी ब्रुकने झळकावले कसोटीतील दुसरे सर्वात वेगवान त्रिशतक, वीरेंद्र सेहवागचा महाविक्रमही मोडला

सध्या सुरू असलेल्या कसोटी सामन्यापूर्वी पाकिस्तानमध्ये प्रतिस्पर्धी संघाने सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम भारताच्या नावावर होता. याच मैदानावर २००४ मध्ये भारताने पाच विकेट्सवर ६७५ धावांवर डाव घोषित केला होता. हा तोच कसोटी सामना होता ज्यात वीरेंद्र सेहवागने त्रिशतक झळकावले होते आणि सचिन तेंडुलकर १९४ धावांवर नाबाद परतला होता. इंग्लंडने मुलतान कसोटीत पहिला डाव ७ विकेट्सवर ८२३ धावांवर घोषित केला.

हेही वाचा – Rafael Nadal Retirement: लाल मातीवरील बादशाहचा टेनिसला अलविदा, अश्रूभरल्या डोळ्यांनी राफेल नदालने निवृत्तीची केली घोषणा

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ५५६ धावा केल्या. कर्णधार शान मसूदने सर्वाधिक १५१ धावांचे योगदान दिले, तर आगा सलमानने १०४ धावा केल्या तर अब्दुल्ला शफीकने १०२ धावा केल्या. इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही आणि कर्णधार ऑली पोप खातेही न उघडता बाद झाला, पण यानंतर इंग्लिश फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांना आनंद साजरा करण्यासाठी फार कमी संधी दिल्या.

हेही वाचा – Ratan Tata Death: टाटा समूहाने ‘या’ क्रिकेटपटूंच्या कारकीर्दीला दिला आकार, सुनील गावसकर, रवी शास्त्री ते युवराज सिंग आणि शार्दुल ठाकूर

जो रूट ३७५ चेंडूत २६२ धावा करून बाद झाला आणि या खेळीत त्याने इंग्लंडसाठी अनेक विक्रम केले. ज्यामध्ये इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी धावांचा विक्रमही समाविष्ट आहे. या खेळीत रूटने २० हजार आंतरराष्ट्रीय धावाही पूर्ण केल्या. इंग्लंडकडून जॅक क्रॉलीने ७८ तर बेन डकेटने ८४ धावा केल्या. हॅरी ब्रूकने त्रिशतक झळकावले आणि ३१७ धावा करून बाद झाला.

पाकिस्तानी गोलंदाजांच्या नावे लाजिरवाणा विक्रम

पाकिस्तानी गोलंदाजांच्या नावावर एक नकोसा विक्रम झाला आहे. या सामन्यात पाकिस्तानकडून ७ खेळाडूंनी गोलंदाजी केली. यापैकी ६ जणांनी १०० किंवा त्याहून अधिक धावा दिल्या. आतापर्यंत, कसोटी क्रिकेटमध्ये असे एकदाच घडले आहे, जेव्हा संघाच्या ६ गोलंदाजांनी १०० किंवा त्याहून अधिक धावा दिल्या आहेत. यापूर्वी असा नकोसा विक्रम झिम्बाब्वेच्या गोलंदाजांच्या नावावर होता, जेव्हा २००४ मध्ये बुलावायो येथे त्यांच्या ६ गोलंदाजांनी १०० किंवा त्याहून अधिक धावा दिल्या होत्या.

हेही वाचा – IND W vs SL W: भारताने वर्ल्डकपमध्ये घेतला आशिया कपचा बदला, गुणतालिकेत न्यूझीलंडला मागे टाकत उपांत्य फेरीच्या दिशेने मोठे पाऊल

७ बाद ८२३ धावा ही इंग्लंडची पाकिस्तानविरुद्धची सर्वोच्च धावसंख्या आहे, ज्यांनी १९५८ मध्ये वेस्ट इंडिजने रचलेला ३ बाद ७९० धावांचा विक्रम मागे टाकला. इंग्लंडने त्यांच्या मागील पाकिस्तान दौऱ्यात रावळपिंडी येथे प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्क्युलमच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने केलेल्या ६५७ धावांच्या धावसंख्येला मागे टाकून इंग्लंडने ही सर्वोच्च धावसंख्या नोंदवली आहे. २०२३ च्या ऍशेसमध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या ५९२ धावसंख्येलाही मागे टाकले आहे.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या

६ बाद ९५२ धावा – श्रीलंका वि भारत, कोलंबो, १९९७
७ बाद ९०३ धावा – इंग्लंड वि ऑस्ट्रेलिया, द ओव्हल, १९३८
८४९ धावा – इंग्लंड वि वेस्ट इंडिज, किंग्स्टन, १९३०
७ बाद ८२३ धावा – इंग्लंड वि पाकिस्तान, मुलतान, २०२४*
३ बाद ७९० धावा – वेस्ट इंडिज वि पाकिस्तान, किंग्स्टन, १९५८

हॅरी ब्रुक-जो रूटची विक्रमी भागीदारी

हॅरी ब्रूक फलंदाजीला आला तेव्हा २४९ धावांवर इंग्लंडच्या ३ विकेट पडल्या होत्या. यानंतर ब्रूकने रुटबरोबर चौथ्या विकेटसाठी ४५४ धावांची विक्रमी भागीदारी केली आणि संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. ब्रूकने त्रिशतक झळकावले तर रूटने दणदणीत द्विशतक झळकावले. रुट २६२ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

Story img Loader