इंग्लंडने पाकिस्तानला त्यांच्या घरच्या मैदानावर टी२० मालिकेत पराभूत करून इतिहास रचला आहे. सात सामन्यांच्या टी२० मालिकेत इंग्लंडने ४-३ ने विजय मिळवला आहे. या मालिकेतील अंतिम सामना लाहोरमध्ये खेळला गेला, ज्यात इंग्लंडने ६७ धावांनी विजय मिळवला. या निर्णायक सामन्यात शानदार अर्धशतकी खेळी करणारा डेव्हिड मलान सामनावीर तर, युवा फलंदाज हॅरी ब्रुक याला मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रविवारी लाहोरमध्ये इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात मालिकेतील शेवटचा टी२० सामना खेळला गेला. येथे इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना २०९ धावा केल्या, प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ केवळ १४२ धावा करू शकला. इंग्लंडकडून डेव्हिड मलानने ७८ धावांची अप्रतिम खेळी खेळली, ज्यात ८ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. सलग दुसऱ्या सामन्यात २०० पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पाकिस्तानचा डाव सुरुवातीपासूनच घसरला. शान मसूदचे अर्धशतक वगळता इतर फलंदाज झुंज देऊ शकले नाहीत. इंग्लंडसाठी ख्रिस वोक्सने सर्वाधिक तीन बळी मिळवले.

हेही वाचा :  भालाफेकपटू शिवपाल सिंग उत्तेजक द्रव्य सेवनप्रकरणी दोषी, ४ वर्षांची घातली बंदी 

१७ वर्षांनी पाकिस्तान दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड संघासाठी ही मालिका कमालीची रोमांचक ठरली. दौऱ्याच्या सुरुवातीलाच कर्णधार जोस बटलर दुखापतग्रस्त झाला होता. मालिकेतील पहिला सामना इंग्लंड संघाने तर दुसरा सामना पाकिस्तान संघाने जिंकला होता. तिसरा सामना इंग्लंडने जिंकल्यानंतर पुढील दोन सामने पाकिस्तानने आपल्या नावावर केले होते. त्यानंतर सहाव्या आणि अखेरच्या सामन्यात विजय मिळवत इंग्लंडने हा दौरा यशस्वी केला. टी२० विश्वचषकापूर्वी इंग्लंडसाठी हा मालिका विजय आत्मविश्वास मिळवण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.