फिफा विश्वचषकासाठी इंग्लंडहून सात हजारांपेक्षा जास्त चाहते ब्राझीलमध्ये दाखल झाले आहेत. पण इंग्लंड आणि इटली यांच्यात अ‍ॅमेझॉन येथे होणाऱ्या सामन्यासाठी चाहत्यांनी खेळाडूंना धोक्याचा इशारा दिला आहे. अ‍ॅमेझॉन जंगलाजवळ असलेल्या मनाऊस स्टेडियमवर हा सामना होणार असून येथील वातावरणाचीच चाहत्यांना अधिक भीती वाटू लागली आहे. या स्टेडियमच्या बांधणीसाठी मोठय़ा प्रमाणात वाळूचा वापर करण्यात आल्यामुळे समुद्रकिनारी जाताना वाळूत रुतण्याचा धोका निर्माण झाला आहे. जानेवारी २०१२पासून येथील समुद्रकिनाऱ्यांवर तब्बल १७ जणांचा वाळूत रुतून मृत्यू झाला आहे.
एका २० वर्षीय युवकाने संपूर्ण रात्र समुद्रकिनाऱ्यावर घालवल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना फेब्रुवारी महिन्यात घडली होती. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये येथूनच तीन मगरी पकडण्यात आल्या होत्या. अजूनही या परिसरात मगरींचा मुक्त वावर असल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. नेग्रो नदीमध्ये पोहताना तळाशी जाणाऱ्यांवर पिरान्हा मासे हल्ला करत असल्याची घटनाही घडली आहे. गेल्या वर्षी १३ जलतरणपटूंना पिरान्हा माशाने चावा घेतला होता. त्यांच्या बोटांना आणि पायांना पिरान्हा माश्याने चावे घेतले होते. गेल्या आठवडय़ात पिरान्हा माश्याच्या हल्ल्यामुळे एका पाच वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा